शेती यांत्रिकीकरण डिझेल पुरवठा

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply

 

जी-7 देशांकडून 10 कोटी बॅरल तेल बाजारात आणण्याचा निर्णय

नवी दिल्ली (Farm Mechanization Diesel Supply) : हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देशांनी आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल आणि डिझेल बाजारात (Diesel Supply) आणण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (IEA) समन्वयातून हा अतिरिक्त पुरवठा पुढील चार महिन्यांत टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे. सुरुवातीच्या 20 दिवसांत मोठ्या प्रमाणावर डिझेल बाजारात आणण्याचे नियोजन आहे.

जागतिक बाजारात तेलपुरवठ्यावर निर्माण (Farm Mechanization Diesel Supply) झालेल्या तणावामुळे इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम वाहतूक, उद्योग तसेच शेतीच्या उत्पादन खर्चावर होत आहे. विशेषतः डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टर, सिंचन पंप, कापणी यंत्रे आणि कृषी मालाची वाहतूक यांचा खर्च वाढतो.

त्यामुळे जी-7 देशांच्या तेलसाठ्यातून अतिरिक्त पुरवठा सुरू झाल्यानंतर जागतिक बाजारातील इंधनदरावरील (Diesel Supply) दबाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा देशांतर्गत इंधनदरांवरही झाला, तर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, त्याचा प्रत्यक्ष परिणाम जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि देशांतर्गत इंधनदरांच्या धोरणावर अवलंबून राहणार आहे.

शेतीचा उत्पादन खर्च कमी होण्याची अपेक्षा

डिझेल हे शेतीच्या यांत्रिकीकरणातील (Farm Mechanization Diesel Supply) अत्यंत महत्त्वाचे इंधन आहे. ट्रॅक्टरद्वारे मशागत, सिंचनासाठी पंप चालवणे, पीक काढणी आणि शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणे यासाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलचा वापर केला जातो. त्यामुळे डिझेलच्या दरातील वाढ थेट शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर परिणाम करते. (Farm Mechanization) इंधनदरातील वाढीला आळा बसल्यास शेतीतील यांत्रिकीकरणाचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जी-7 देशांचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अप्रत्यक्षपणे दिलासादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति मे. टन 4200 रुपये अंतिम दर द्या!

उसाला प्रति मे. टन 4200 रुपये अंतिम दर द्या!

Latur Farmers' Organization: पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसाला प्रति मेट्रिक टन 4200 रुपये अंतिम दर मिळावा, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याचा ऊस चाऱ्यासाठी 4000 रु

Nov 12, 2026
भारतीय अर्थव्यवस्थेला वेग! जुलै-सप्टेंबर तिमाहीत GDP ग्रोथ 7.8% राहण्याचा SBI Research चा अंदाज

भारतीय अर्थव्यवस्थेला वेग! जुलै-सप्टेंबर तिमाहीत GDP ग्रोथ 7.8% राहण्याचा SBI Research चा अंदाज

SBI Research च्या अंदाजानुसार भारताचा GDP विकासदर जुलै-सप्टेंबर तिमाहीत 7.8% राहू शकतो. RBI च्या अंदाजापेक्षा अधिक वाढीची शक्यता.

Nov 12, 2026
‘विलिनीकरण ठरले तर आम्हाला सांगतील’; राष्ट्रवादीच्या चर्चांवर फडणवीसांचे भाष्य

‘विलिनीकरण ठरले तर आम्हाला सांगतील’; राष्ट्रवादीच्या चर्चांवर फडणवीसांचे भाष्य

NCP विलिनीकरणावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान. शरद पवार, सुनेत्रा पवार, गोकुळ वाद आणि बिश्नोई टोळीवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.

Nov 10, 2026
'गोकुळात कृष्ण वाढतो, मंत्रालयात कंस बोटं मोडतो'; विवेकानंद पाटलांचा टोला!

'गोकुळात कृष्ण वाढतो, मंत्रालयात कंस बोटं मोडतो'; विवेकानंद पाटलांचा टोला!

गोकुळ संघर्ष मोर्चात विवेकानंद पाटलांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल. शासकीय संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून उपस्थित केले सवाल.

Nov 09, 2026
गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन! सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा विराट संघर्ष मोर्चा

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन! सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा विराट संघर्ष मोर्चा

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा. महायुतीच्या पाच तज्ज्ञ संचालक नियुक्तींविरोधात शेतकरी आक्रमक.

Nov 09, 2026