जंतर-मंतर 2.0 आंदोलनातही सक्रिय भूमिका
नवी दिल्ली (Neha Bora) : राजधानी दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या (India Alliance) वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात नेहा बोरा (Neha Bora) चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्या. आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित असतानाही माध्यमांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. राहुल गांधी यांच्यासह त्या खुल्या टेम्पोतून मोर्चात सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिल्या. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला, तर काहींनी त्यांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या.
गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या ‘जंतर-मंतर 2.0 आंदोलनातही नेहा बोरा (Neha Bora) सक्रिय दिसल्या. पोलिसांची कारवाई टाळत आंदोलन पुढे नेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची चर्चा झाली होती. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागले.
Neha raises her powerful voice once again against vote chori during today's Grand March from Barakhamba to the Supreme Court . https://t.co/Wz4XS8ImBI
— Neha Bora Team (@NehaAisa) October 12, 2026
दरम्यान, या (India Alliance) आंदोलनात ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) नेते सहभागी झाले नाहीत. आंदोलनाची पुढील दिशा नंतर निश्चित केली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे आंदोलनाच्या नेतृत्वात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे चित्र दिसले. दुसरीकडे, ‘इंडिया’ आघाडीचा (India Alliance) भाग नसलेल्या आम आदमी पक्षानेही सोमवारच्या मोर्चापासून दूर राहणे पसंत केले.
दोन ते अडीच तास मोर्चाची वाटचाल; पोलिसांनी घातला अडथळा
बाराखंबा-कॅनॉट प्लेस परिसरातून सुरू झालेला मोर्चा सुमारे दोन ते अडीच तास सुरू होता. जवळपास दोन किलोमीटर अंतर पार केल्यानंतर भगवानदास रोडवरील राष्ट्रीय नाट्य अकादमीजवळ पोलिसांनी मोर्चाला रोखले. सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरापासून काही अंतरावरच पुढील मार्ग बंद करण्यात आला.
OOPS MOMENT FROM YESTERDAY’S PROTEST! 😌 https://t.co/7v7fvGmhrr
— Neha Bora Team (@NehaAisa) October 13, 2026
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांसह शीघ्र कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि राखीव पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले. तसेच, जमावबंदी लागू असल्याच्या सूचना पोलिसांकडून वारंवार दिल्या जात होत्या.
नेहा बोरांचा (Neha Bora) सहभाग, विविध संघटनांची भूमिका आणि पोलिसांनी मोर्चाला घातलेला अडथळा यांमुळे दिल्लीतील या (India Alliance) आंदोलनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले.