Press Conference Chaos

‘पत्रकार परिषद बंद करा’च्या घोषणा; कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, अभिजीत दिपकेंचा घोषणाबाजी करणाऱ्यांवर हल्लाबोल; सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेविरोधात शुक्रवारी आंदोलन.

‘पत्रकार परिषद बंद करा’च्या घोषणा; कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

Press Conference Chaos

सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेविरोधातील आंदोलनापूर्वी पत्रकार परिषदेत जोरदार घोषणाबाजी; ‘५०-१०० रुपयांसाठी गोंधळ घालतात’, अभिजीत दिपकेंची टीका

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेत जोरदार घोषणाबाजी झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. पक्षाचे सदस्य सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलनाची तयारी सुरू असतानाच पत्रकार परिषदेत गोंधळ निर्माण झाला. यावेळी ‘पत्रकार परिषद बंद करा’ अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रकारानंतर अभिजीत दिपके यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांवर टीका करत, ५० ते १०० रुपयांसाठी गोंधळ घालणारे लोक असल्याचा आरोप केला.

या पत्रकार परिषदेला नेहा बोरा आणि अभिजीत दिपके उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमादरम्यान जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. पत्रकार परिषद थांबवण्याची मागणी करत काही जणांनी घोषणा दिल्या. या गोंधळावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांनी संबंधितांवर निशाणा साधला.

दरम्यान, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी बुधवारीच अभिजीत दिपके यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता कॅनॉट प्लेस परिसरात जमण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत झालेल्या गोंधळामुळे पक्षाच्या कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली आहे. अटकेच्या निषेधार्थ होणाऱ्या आंदोलनापूर्वीच पत्रकार परिषदेत घोषणाबाजी झाल्याने पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

एका न्यूड फोटोसाठी देशाची गुपितं पाकिस्तानला विकली!

एका न्यूड फोटोसाठी देशाची गुपितं पाकिस्तानला विकली!

न्यूड फोटोच्या आमिषाने भारतीय हवाई दलातील विंग कमांडरने पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप. 3,008 व्हॉट्सॲप मेसेजचा चार्जशीटमध्ये खुलासा.

Nov 13, 2026
आंदोलनांसाठी सार्वजनिक जागा अनिश्चित काळ अडवता येणार नाही! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

आंदोलनांसाठी सार्वजनिक जागा अनिश्चित काळ अडवता येणार नाही! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

सार्वजनिक जागांवरील आंदोलनांना कालमर्यादा हवी, असे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण. दिवाळीतील आंदोलनांवर व्यापाऱ्यांची याचिका.

Nov 03, 2026
SSC Exam Date 2026: जेई आणि दिल्ली पोलीस-CAPF SI परीक्षांच्या तारखांत बदल; पाहा नवीन वेळापत्रक

SSC Exam Date 2026: जेई आणि दिल्ली पोलीस-CAPF SI परीक्षांच्या तारखांत बदल; पाहा नवीन वेळापत्रक

SSC JE आणि दिल्ली पोलीस/CAPF SI परीक्षांच्या तारखा बदलल्या. नवीन वेळापत्रक, प्रवेशपत्र अपडेट आणि SSC ची अधिकृत नोटीस कशी डाउनलोड करावी, जाणून घ्या.

Oct 28, 2026
जंतर-मंतर हिंसाचार प्रकरणाची होणार चौकशी; न्यायालयाची समिती करणार सुनावणी !

जंतर-मंतर हिंसाचार प्रकरणाची होणार चौकशी; न्यायालयाची समिती करणार सुनावणी !

Jantar Mantar violence case: जंतर-मंतर येथे जुलै महिन्यात झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार, पेलेट गनचा कथित वापर, महिला आंदोलकांशी गैरवर्तन आणि पोलिसांकडून झालेल्या कथित अत्याचारांच्या आरोपांची चौकशी

Oct 25, 2026
तुरुंगातून बाहेर येताच सौरभ दासच्या अडचणी वाढल्या; आशुतोष रांकाही अडचणीत!

तुरुंगातून बाहेर येताच सौरभ दासच्या अडचणी वाढल्या; आशुतोष रांकाही अडचणीत!

Cockroach Janata Party Protest: तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे सहसंयोजक सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून

Oct 23, 2026