पुणे मोबिलिटी केंद्र

पुण्याची वाहतूक क्रांती! 2030 पर्यंत बनणार देशाचे मोबिलिटी हब

Pune Mobility Centre: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशात आधुनिक वाहतूक सुविधांचा विस्तार वेगाने सुरू आहे. मेट्रो, इलेक्ट्रिक बस, इनर आणि आउटर रिंग रोड, भूमिगत मार्ग, बोगदे तसेच नव्या विमानतळ

पुण्याची वाहतूक क्रांती! 2030 पर्यंत बनणार देशाचे मोबिलिटी हब

Pune Mobility Centre

मेट्रो, रिंग रोड आणि विमानतळाच्या विकासातून दळणवळणाचे जाळे विस्तारणार

पुणे (Pune Mobility Centre) : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशात आधुनिक वाहतूक सुविधांचा विस्तार वेगाने सुरू आहे. मेट्रो, इलेक्ट्रिक बस, इनर आणि आउटर रिंग रोड, भूमिगत मार्ग, बोगदे तसेच नव्या विमानतळाच्या माध्यमातून दळणवळणाचे सक्षम जाळे उभारण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे 2030 पर्यंत पुणे महानगर प्रदेश देशातील प्रमुख मोबिलिटी हब म्हणून विकसित होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे लोकार्पण (Pune Mobility Centre) आणि मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

120 किलोमीटरचे मेट्रो मार्ग

पुण्यात सुमारे 120 किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार झाले असून, विविध मार्गांवरील पुढील कामे सुरू आहेत. राज्यातील 12 महापालिका क्षेत्रांमध्ये मेट्रो सेवा सुरू झाली आहे किंवा मेट्रोची कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला केंद्र सरकारकडून पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. याशिवाय (Pune Mobility Centre) मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी 426 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा

मेट्रो, रिंग रोड, इलेक्ट्रिक बस आणि इतर वाहतूक प्रकल्प एकमेकांशी जोडल्यामुळे पुणे महानगर प्रदेशातील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. या (Pune Mobility Centre) एकात्मिक वाहतूक व्यवस्थेमुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचून सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास चालना मिळेल.

आयटी आणि उद्योग क्षेत्राला चालना

पुणे हे माहिती तंत्रज्ञान, उत्पादन आणि नवतंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र आहे. वाहतूक सुविधांचा विस्तार झाल्यामुळे या क्षेत्रांच्या विकासाला अधिक गती मिळेल. शहर आणि उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारल्याने औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मेट्रो, रिंग रोड, विमानतळ आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून (Pune Mobility Centre) पुणे महानगर प्रदेशाला भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजांनुसार विकसित करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीतून २०३० पर्यंत पुणे देशातील प्रमुख दळणवळण केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

संबंधित सामग्री

विद्यार्थी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; वर्षभरात 1,909 आत्महत्यांची नोंद

विद्यार्थी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; वर्षभरात 1,909 आत्महत्यांची नोंद

Maharashtra Student Suicides: देशातील विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) 2024 च्या अहवालातील आकडेवारीवरून समोर आल

Nov 12, 2026
दुपारी उन्हाचा चटका, तर रात्री गारठा! राज्यात पुढील चार दिवसांत थंडीचा जोर वाढणार

दुपारी उन्हाचा चटका, तर रात्री गारठा! राज्यात पुढील चार दिवसांत थंडीचा जोर वाढणार

Maharashtra Climate Change: दिवाळीनंतर महाराष्ट्रातील हवामानात बदल जाणवू लागला आहे. राज्यातील बहुतांश भागांतून पावसाने माघार घेतली असून, आगामी काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Nov 12, 2026
नागपुरात शिक्षक दाम्पत्याची आत्महत्या; दिवाळीसाठी आलेल्या पती-पत्नीचा घरात आढळला मृतदेह

नागपुरात शिक्षक दाम्पत्याची आत्महत्या; दिवाळीसाठी आलेल्या पती-पत्नीचा घरात आढळला मृतदेह

नागपुरातील रेवतीनगर येथे शिक्षक दाम्पत्य मनीष आणि सोनाली गणवीर यांचे मृतदेह आढळले. बेलतरोडी पोलिसांकडून तपास सुरू.

Nov 10, 2026
धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

Punjab Karmabhoomi Express Fire: धनतेरसच्या दिवशी पंजाबमध्ये अमृतसरहून न्यू जलपाईगुडीकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. सराय बंजारा रेल्वे स्थानक घटना.

Nov 06, 2026
राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पवार-पटेल भेटीने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण

राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पवार-पटेल भेटीने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण

Nationalist Congress Party: राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या भेटीमुळे पुन्हा उधाण आले...

Nov 06, 2026