Sanjay Raut

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, राऊतांनी मागितली माफी

सरन्यायाधीशांवरील वक्तव्यावरून संजय राऊतांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली. फौजदारी अवमान कारवाईच्या शक्यतेने राजकीय वर्तुळात चर्चा.

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार?  सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, राऊतांनी मागितली माफी

नवी दिल्ली : एसआयआर प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान सरन्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यांची न्यायालयाने दखल घेतली आहे. या प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली. दरम्यान, न्यायालयाच्या फौजदारी अवमानाची कारवाई सुरू करण्यासाठी अ‍ॅटर्नी जनरल यांनी संमती दिल्याची माहिती समोर आली आहे.

एसआयआर प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात येत होते. इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत सरन्यायाधीशांबाबत टिप्पणी केली होती. या विधानांमुळे वाद निर्माण झाला असून आता या प्रकरणाला न्यायालयीन वळण मिळाले आहे.

न्यायालयाने वक्तव्यांची घेतली दखल

निवडणूक आयोगाविरोधात दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी न्यायालयाबाबत केलेल्या विधानांचा मुद्दा उपस्थित झाला. संबंधित वक्तव्यांवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी संबंधित याचिकाकर्त्याला आपल्या वर्तनाबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे स्पष्ट केले.

संजय राऊत यांच्या वक्तव्यांबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. तसेच, फौजदारी अवमानाची कारवाई सुरू करण्यासाठी अ‍ॅटर्नी जनरल यांची संमती मिळाल्याची माहिती समोर आल्याने राऊत यांच्यावरील कायदेशीर कारवाईची शक्यता चर्चेत आली आहे.

इंडिया आघाडीच्या सभेत नेमकं काय म्हणाले होते राऊत?

इंडिया आघाडीच्या रॅलीत भाषण करताना संजय राऊत यांनी देशातील लोकशाही व्यवस्था, निवडणूक प्रक्रिया आणि न्यायसंस्थेच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. देशात हुकूमशाहीसदृश वातावरण असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणुकांमध्ये गैरप्रकार होत असल्याचा दावा केला होता.

विरोधकांना भेटण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याची टीकाही त्यांनी केली होती. लोकशाहीच्या रक्षणासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतरही अपेक्षित न्याय मिळत नसल्याचे राऊत यांनी म्हटले होते.

याशिवाय, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांतील काही न्यायाधीशांचे भाजप नेत्यांशी संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. न्यायाधीश भाजप नेत्यांसोबत बॅडमिंटन खेळतात आणि राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहतात, असे विधान त्यांनी केले होते. या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेबाबत वाद निर्माण झाला.

संजय राऊतांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली

वाद वाढल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली. सर्वोच्च न्यायालयाविषयी आपल्याला आदर असून माफी मागण्यात कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालय हे देशातील अत्यंत महत्त्वाचे घटनात्मक संस्थान असल्याचे सांगत सामान्य नागरिक न्यायासाठी याच न्यायालयाकडे आशेने पाहतात, असे राऊत म्हणाले. न्याय मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय हा सामान्य जनतेसाठी शेवटचा आशेचा किरण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अंकिता भंडारी प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी करतानाच शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादात गेल्या चार वर्षांपासून लढा सुरू असून अद्याप न्याय मिळालेला नसल्याचेही राऊत यांनी सांगितले. आम्ही न्यायाची मागणी करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संजय राऊत यांनी माफी मागितल्यानंतर या प्रकरणात न्यायालय पुढे काय भूमिका घेणार, तसेच फौजदारी अवमानाच्या संभाव्य कारवाईचे काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

'माझा फोन टॅप केला जातोय'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

'माझा फोन टॅप केला जातोय'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Rahul Gandhi: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम

Nov 13, 2026
दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच! - छगन भुजबळ

दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच! - छगन भुजबळ

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर छगन भुजबळांचं मोठं विधान! शरद-अजित पवार एकत्र आल्यास जुन्या कार्यकर्त्यांना आनंद होईल, अशी भूमिका.

Nov 13, 2026
अजित पवार भाजपविरोधात मोठा निर्णय घेणार होते? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

अजित पवार भाजपविरोधात मोठा निर्णय घेणार होते? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

अजित पवार भाजपविरोधात संघर्ष करणार होते? संजय राऊतांचा मोठा दावा. विमान अपघातावरून सुनेत्रा आणि पार्थ पवारांना थेट सवाल.

Nov 13, 2026
विलिनीकरणाआधी पार्थ पवारांची मोठी खेळी? पुण्यात सात आमदारांची गुप्त बैठक

विलिनीकरणाआधी पार्थ पवारांची मोठी खेळी? पुण्यात सात आमदारांची गुप्त बैठक

पार्थ पवारांची पुण्यात सात आमदारांसोबत बैठक. संजय राऊतांच्या दाव्यानंतर सुनेत्रा पवार गटातील राजकीय हालचालींना वेग.

Nov 13, 2026
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाआधीच राजकीय भूकंप? अजितदादा महायुतीची साथ सोडणार होते; अतुल लोंढेंचा मोठा दावा

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाआधीच राजकीय भूकंप? अजितदादा महायुतीची साथ सोडणार होते; अतुल लोंढेंचा मोठा दावा

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत नवा ट्विस्ट! अजित पवार महायुती सोडणार होते, असा अतुल लोंढेंचा दावा; संजय राऊतांनी 20 ते 22 आमदारांबाबत विधान केले.

Nov 12, 2026