यवतमाळ (Desi Kattas Seiz) : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असतांना तडीपार कुख्यात गुड भैया यादव रा. देवी नगर व पप्या रावेकर रा. इंदिरा नगर हे देशी कट्टे घेवून लोहारा बायपास वरील पमाईला लॉन येथे फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्याठीकानी पोलिसांचे पथक पोहोचले असताना पाहून भैय्या व पप्या पळून जाण्याच्या मार्गावर होते. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन दोन्ही आरोपींना पकडून त्यांची अंगझडती घेतली. देशी बनवाटीची पिस्तल (कट्टा) मॅकझीन्ससह व २ जिवंत काडतूस (Desi Kattas Seiz) किंमत अंदाजे १ लाख २ हजार रुपयाचा मुद्देमाल पंचनामा करुन जप्त करण्यात आला.
पोलीस स्टेशन लोहारा येथे नमूद आरोपीं विरुध्द कलम ३/२५ आर्म अॅक्ट सहकलम १३५, १४२ महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोर्पीना अटक करण्यात आली असून (Desi Kattas Seiz) गुन्हयाचा पुढील तपास पो.नि मुनेश्वर मॅडम पो.स्टे. लोहारा हे करत आहे. सदर आरोर्पीविरुध्द यापुर्वी खुन, खुनाचा प्रयत्न, व इतर गंभीर गुन्हे नोंद आहेत. भैया यादव हा तडीपार असतांना शहरात अग्निशस्त्रासह फिरत असतांना वेळीच अटक केल्याने होणार्या गंभीर गुन्हयांना प्रतिबंध करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ला यश आले आहे.
सदरची कारवाई. पो.अ. कुमार चिंता अ. पो.अ.पियुष जगताप ,पो. नि. स्था. गु.शा. सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो नि. संतोष मनवर ,सफौ योगेश गटलेवार पो.ह.वा. अजय डोळे, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, निलेश राठोड, रितुराज मेडवे, पोशि आकाश सहारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.




