ह.भ.प अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता
परभणी (Sri Kshetra Tridhara) : तालुक्यातील श्री क्षेत्र त्रिधारा येथे श्री देव ओंकारनाथ भगवान यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त वार रविवार 16 मार्च ते वार रविवार 23 मार्च या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. (Sri Kshetra Tridhara) देव ओंकारनाथ भगवान यांचा पुण्यतिथी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी ह.भ.प अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली.
श्री क्षेत्र त्रिधारा (Sri Kshetra Tridhara) येथे प.पु श्री देव ओंकारनाथ भगवान यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कथेचे निरुपन ह.भ.प बाळु गुरू असोलेकर यांनी केले. सदरील सोहळ्या निमित्त पहाटे 4 ते 6 काकडा, 6 ते 7 देवाची आरती, सकाळी 7 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 1 ते 4 भागवत कथा, रात्री 8 ते 10 हारी किर्तन व जागर आदी दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भागवत कथेचे निरुपन ह.भ.प बाळू गुरु असोलेकर यांनी केले.
या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमासह नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन झाले. वार रविवार 23 मार्च ह.भ.प अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या काल्याचे किर्तन झाले. सकाळी देव ओंकारनाथ भगवान यांच्या पालखीची भव्य पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्या (Sri Kshetra Tridhara) निमित्त भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.