सुदैवाने जीवितहानी टळली
भंडारा/माडगी (Tipper Accident) : तुमसर-तिरोडा मार्गावरील मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज वळणावर गोंदियाच्या दिशेने जाणारा भरधाव टिप्पर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतबांधित उलटला. (Tipper Accident) टिप्परने तीन-चार पलट्या मारल्या. मात्र सुदैवाने टिप्परमधील चालक व वाहक सुदैवाने बचावले. सदर घटना दि.१४ जून रोजी मध्यरात्रीदरम्यान घडली.
चिखला माईन्स येथील टिप्पर क्र.एमएच ४० सीटी १७४३ हा गोंदियाकडे जात असतांना देव्हाडा बुज वळणावर टिप्पर अनियंत्रित होऊन उलटला. नशीब बलवत्तर म्हणून टिप्परने तीन-चार पलट्या मारुनही टिप्पर मधील चालक व वाहक सुखरुप बचावले. या वळणावर या अगोदर अशा प्रकारचे अनेक अपघात घडलेले आहेत. (Tipper Accident) सदर वळण धोकादायक असल्याने या ठिकाणी अपघात टाळण्याच्या दृष्टिने काही उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.




