परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील सार्थक नवले याच्या कुटुंबियांचा प्रेरणादायी निर्णय
परभणी (Devagiri Hospital) : मेंदूमध्ये झालेल्या आंतर्गत रक्तस्त्रावामुळे मेंदूमृत झालेल्या १८ वर्षीय युवकाच्या अवयवदानामुळे ३ गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले. मेंदूमृत रुग्णाच्या यकृताचे प्रत्यारोपण गरजू रुग्णांवर करण्यात आले. त्यामुळे ते लवकरच निरोगी आयुष्य जगू शकणार आहेत. (Organ donation) अवयवदान केलेला ब्रेनडेड १८ वर्षीय युवक हा जिंतूर येथील रहिवासी होता आणि तेथे ज्ञानोपासक महाविद्यालयात वाणिज्य शाखेत इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता.
देवगिरी हॉस्पिटलची टीम रात्रीपासून कामाला
या संदर्भात अधिक माहिती देताना परभणी येथील (Devagiri Hospital) देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. एकनाथ गषबाळे यांनी सांगितले की, “जिंतूर येथील १८ वर्षीय सार्थक प्रवीण नवले या रूग्णाचा मेंदू मृतवत झाल्याने प्रमुख नातेवाईकांनी घेतलेल्या धाडसी निर्णयानुसार दोन किडण्या व यकृत काढण्यात आले. त्या (Organ donation) अवयवांचे गरजू रुग्णांना प्रत्यारोपण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे तिन्ही अवयव पाठवण्यात आले.