देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला परवाना : डॉ. एकनाथ गबाळे
परभणी (Devagiri Super Specialty Hospital) : देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला किडनी प्रत्यारोपनासाठी झोनल ऑर्गन ट्रान्सप्लान्ट कमिटीकडून मंजुरी मिळाली असून आता अनेक गरजू, गरीब रुग्णांवर परभणीत माफक दरात ही महागडी शस्त्रक्रिया करता येईल, अशी माहिती संचालक न्युरोसर्जन डॉ. एकनाथ गबाळे (Dr. Eknath Gabale) यांनी दिली आहे.
जागतिक अवयवदिनी दिनी परभणीच्या (Devagiri Super Specialty Hospital) देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी इंडियन मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.राजगोपाल कालानी, डॉ. संदीप कारले, डॉ.परमेश्वर साळवे, डॉ.भगवान कोरडे, डॉ.राहुल टेंगसे, डॉ.निनाद सूर्यतळे, डॉ. कौशल कोंडावार, डॉ.विजय बोंडे, ट्रान्सप्लांट समन्वयक श्री विनोद डावरे यांची उपस्थिती होती.
डॉ. गबाळे (Dr. Eknath Gabale) यांनी सांगितले की, अनेक गरजू, गरीब रुग्ण या महागड्या सेवेपासून वंचित आहेत व आजही डायलिसिसच्या वार्या करत आहेत. आता विविध सेवाभावी संस्थांच्या व सरकारी व निम्न सरकारी योजनांच्या अंतर्गत व तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत योग्य त्या सुविधांचा व प्रणालीचा वापर करून मुंबई, पुणे व छत्रपती संभाजीनगर येथेच फक्त होऊ शकणारी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही मराठवाड्याच्या मधोमध असलेल्या परभणी शहरातील (Devagiri Super Specialty Hospital) देवगिरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सुरु करण्याचा परवाना हा अवयव प्रत्यारोपण करणार्या कमिटीने परवाना नुकताच बहाल केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णांची सोय होणार आहे. यावेळी डॉ.टेंगसे, डॉ.कोंडावार, डॉ. कालानी, डॉ. कारले, डॉ. साळवे यांनी देखील संपूर्ण प्रक्रियेची माहिती देवून अवयवदानासाठी जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले.
हा परवाना मिळवण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बड़े, डॉ. जयश्री यादव, डॉ. अशोक बन, डॉ. किशोर सुरवसे, डॉ. सारंग, डॉ. मोरे व डॉ. एकनाथ गबाळे, डॉ. अतुल जाधव, डॉ. श्रद्धा गबाळे, डॉ. सुशील राठोड, डॉ. निनाद सूर्यतळे, डॉ. कौशल कोंडावार, डॉ. अमिताभ कडतन, डॉ. संदीप कारले, डॉ. दिनेश कांबळे व छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. जितेंद्र आव्हाड तसेच विनोद गारुडी, विनोद डावरे यांनी पुढाकार घेतला.