मेलबर्न(Melbourne):- पापुआ न्यू गिनीमध्ये शुक्रवारी झालेल्या भूस्खलनात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू (death) झाल्याची भीती ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्प (Broadcasting Corp) ने दिली आहे. एबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण पॅसिफिक बेट(South Pacific Islands) राष्ट्राची राजधानी पोर्ट मोरेस्बीच्या वायव्येस 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या एन्गा प्रांतातील काओकलाम गावात भूस्खलन झाल्याचे वृत्त आहे.स्थानिक वेळेनुसार पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात(Accident) झाला. मृतांची संख्या 100 पेक्षा जास्त असू शकते, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी या आकडेवारीला दुजोरा दिलेला नाही.
स्थानिक लोक बचावकार्याला मदत करत आहेत
भूस्खलनामुळे(Landslide) अनेक गावांतील घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. मदत आणि बचाव कर्मचारी इथून लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. अनेक मृतदेह(dead body) बाहेर काढण्यात आले आहेत. भूस्खलनानंतर गाडलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोक मदत आणि बचाव कर्मचाऱ्यांना मदत करत आहेत. पापुआ न्यू गिनीचे(Papua New Guinea) सरकार आणि पोलिसांनी अद्याप या घटनेवर भाष्य केलेले नाही. पापुआ न्यू गिनी हा एक वैविध्यपूर्ण विकसनशील देश आहे, जिथे 800 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. येथील बहुतांश लोक शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. पापुआ न्यू गिनीची लोकसंख्या १ कोटी आहे. हा ऑस्ट्रेलिया नंतर सर्वात जास्त लोकसंख्या असलेला दक्षिण पॅसिफिक(South Pacific) देश आहे. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या २ कोटी ७० लाख आहे.
पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंप झाला
भूस्खलनापूर्वी पापुआ न्यू गिनीच्या भूकंपाचे धक्केही जाणवले. हा भूकंप(Earthquake) फिन्शाफेनच्या वायव्येस 39 किलोमीटर अंतरावर आला आणि रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.3 मोजली गेली. भारतीय वेळेनुसार पापुआ न्यू गिनीमध्ये गुरुवारी सकाळी ९.४९ वाजता हा भूकंप झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनेही पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंप झाल्याची पुष्टी केली आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.