मानोरा (PM Narendra Modi) : भारत देश कृषीप्रधान देश असुन केंद्र व राज्य सरकार विकसित भारत आणि विकसित करण्यासाठी कृषि विषयक क्रांती करण्याचे काम करत आहे. आजपर्यंत विकासाची गती गतिमान करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केली आहे. विकसित महाराष्ट्र राज्य करण्याचे विकसित भारत देशाचे स्वप्न आहे. काँगेस व महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना फसविण्याचे काम केले आहे, त्यामुळे त्यांच्यापासून सावधान राहण्याचा इशारा (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. ५ ऑक्टोंबर रोजी बंजारा विरासत संग्रहालय लोकार्पण सोहळा प्रसंगी पोहरादेवीत दिला.
सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महंत यांना नमन करून व्यासपिठावर आसन ग्रहण केले. यावेळी कवल पट्टा व पगडी घालून स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कार्यक्रमाचे आयोजक कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पि एम सन्मान किसान योजनेचा २० करोड पेक्षा जास्त निधी बटन दाबून देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत केला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण, राजु रंजनसिंह, प्रतापराव जाधव, राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ – वाशीम जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आ. भावना गवळी जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदी उपस्थित होते.
ढे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, संत डॉ रामराव बापू महाराजांनी माझी भेट घेऊन पोहरादेवी येथे येण्याचे निमंत्रण दिले होते, आज ते प्रत्यक्षात अनुभवास आले. देवी जगदंबा माता, संत सेवालाल महाराज व संत रामराव बापू महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन पावन झालो आहे. राज्यातील डब्बल इंजिन सरकारने संत नगरी पोहरादेवी पावन भूमीत बंजारा विरासत नंगारा संग्रहालयाची भव्य उभारणी केली आहे. ही देखणी असुन देशभरातील बंजारा समाजाने कुटुंबासह या पावन भूमीत येऊन पावन व्हावे, बंजारा समाज हा लढवय्या असुन लखिशा बंजारासह इतर लढवय्या पुरुषांचा इतिहास आपल्या भाषणातून कथन केला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पोहरादेवीत संस्कृती, परंपरेचे प्रतिक उभे झाल्याने बंजारा समाजासाठी आजचा दिवस सुवर्ण क्षण आहे. संत सेवालाल महाराजांचे बोल अनमोल आहे. महायुती सरकारने बंजारा विरासत नंगारा संग्रहालय उभे केले, आणि त्याचे लोकार्पण देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाल्याने आम्हाला सर्वाला नवी उर्जा मिळाली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने त्यांचे आभार मानून पालकमंत्री संजय राठोड यांनी अथक प्रयत्नातून पोहरादेवी व उमरी खुर्द तिर्थक्षेत्र कामासाठी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. तसेच त्यांच्या मार्गदर्शनात राज्यात डब्बल इंजिन सरकारने लाडकी बहीण व लाडका भाऊ योजना सुरू केली आहे. विरोधी पक्ष निवडणूक झाली की ही योजना बंद करण्यात येईल, असे बोलत आहेत. परंतु आमचे सरकार असे पर्यंत ही योजना बंद करणार नाही, असे सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजीत पवार, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह, राजु रंजनसिंह, आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचे आयोजक पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवीत आल्याने माझे गुरू संत रामराव बापूंचे स्वप्न पूर्ण झाले असुन देश भरातील बंजारा समाजाला आनंद झाला आहे. संपूर्ण देशात बंजारा समाज विखुरलेला आहे. एकच बोलीभाषा, एकच पेहराव व संस्कृती एक असताना केंद्रात सदर ठराव एकमताने पारीत करून बंजारा समाजाला एका सुचित आरक्षण द्यावे ही समाजासाठी बापूंनी केलेली मागणी पंतप्रधान समोर मांडली. तसेच आकांक्षित वाशीम जिल्हा व लगतच्या यवतमाळ जिल्हयात मोठे व्यवसाय नसल्याने उद्योगधंदे उभारून दोन्ही जिल्हे जीएसटी तून मुक्त करण्याचीही मागणी मांडली. पोहरादेवीत पार पडलेल्या विराट सभेला सहा लाखापेक्षा देशभरातील नागरिकांनी हजेरी लावली होती. विभागीय आयुक्त निधी पांडे, पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोफळे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकार्पण सोहळा कार्यक्रम शांततेत पार पडला.