पुसद (Pusad Assembly Constituency) : पुसद विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आ. इंद्रनील नाईक (MLA Indranil Naik) यांच्या पुढाकारात पुसदचे 67 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनेचे काम शहरांमध्ये गुजरात येथील एका विशिष्ट कंपनीला देण्यात आलेले आहे. या अगोदर नप असो सार्वजनिक बांधकाम विभाग असो यांनी निर्माण केलेले रस्ते या पाईप टाकल्यामुळे खोदल्या गेलेले आहेत. संबंधित ठेकेदारार त्याला आमदारांचे पाठबळ आहे ? असं प्रथम दर्शनी दिसत आहे.
तर नपचे पाणीपुरवठा अधिकारी माधव पाटील, त्या कंपनीचे सुपरवायझर बिर्जे हे या संदर्भात उत्तर देण्यास तयार नाहीत. तर (Pusad Assembly Constituency) नपचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत वायकोस सुद्धा या संदर्भात गप्प बसलेले दिसत आहेत. शहरात कोणीही विरोधक शिल्लक दिसत नाहीत की काय? प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच मन मर्जीने बोगस काम करण्याची संधी मिळत आहे.