काँग्रेस सरकार विदर्भावर अन्याय करणारे सोळकी यांचा स्पष्ट आरोप
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Sahebrao Patil Salenki) : काँग्रेस पक्षाने विदर्भाला सापत्नीक वागणूक दिली आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वांनी जेवढा विकास पश्चिम महाराष्ट्र व इतर भागाचा केला त्या तुलनेत विदर्भावर अन्यायच केला आहे. असा स्पष्ट आरोप भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील सोळंकी (Sahebrao Patil Salenki) यांनी करीत चिखली,बुलढाणा तथा विदर्भाच्या विकासासाठी जनतेने भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सरकारच विजयी करण्याचे आवाहन सुद्धा सोळंकी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
सत्तेत आल्यानंतर विरोधकांनाही समानतेची वागणूक महायुती सरकारकडून सातत्याने दिल्या जाते. याउलट केवळ लालसेपोटी अभद्र युती करून मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आमदार श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) भाजपाच्या आमदार असल्याने चिखली मतदार संघातील शेतकऱ्यांना काेणतीच मदत मिळणार नाही याची दक्षता घेतली हाेती. परंतू सत्तांतर हाेताच आमदार महालेंनी देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडून हजाराे काेटींची मदत शेतकऱ्यांना मिळवून दिली. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे सरकार असलेल्या महायुती सरकाने प्रामुख्याने विदर्भातील कापूस उत्पादक पट्ट्यासह सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना लागू करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील असल्याचेही दाखवून दिले आहे. ज्या ज्या वेळी महाराष्ट्र मध्ये काँग्रेस विचारसरणीचे सरकार आले त्यावेळी या सरकारातील नेतृत्वांनी विदर्भावर अन्याय केला आहे केवळ पश्चिम महाराष्ट्र इतर काही ठराविक भागाचा त्यांनी विकास केला विदर्भाला विकासापासून दूर ठेवणाऱ्या प्रवृत्तीला आता नष्ट करावे लागेल यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातील जनतेने भारतीय जनता पार्टीसह महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन भाजपाचे जेष्ठ नेते साहेबराव पाटील साेळंकी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
शेतकऱ्यांना काेट्यवधीची झाली मदत, कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त
आकडेवारीनुसार पीएम किसान सन्मान निधी याेजने अंतर्गत सन २०१५-१६ ते २०२५-२५ या वर्षांत प्रती शेतकरी कुटूंबास ६ हजार प्रमाणे १७ हप्ते देण्यात आले असून याअंतर्गत ११४.११ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना ३२ हजार १०६ .१२ काेटी रूपयांचे अनुदान देण्यात आले आहे. तर नमाे शेतकरी महासन्मान निधी याेजनेअंतर्गत ६ हजार प्रति लाभार्थी यानुसार ९१.९३ लाख शेतकऱ्यांना ७ हजार १३३.६७ काेटी रूपयांचे अनुदान देण्यात आली आहे, असे साेळंकी (Sahebrao Patil Salenki) यांनी प्रसिध्दी पत्रकातून स्पष्ट केले आहे.
नैसर्गिक आपत्तीत महायुती सरकार संवेदनशील
नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांना महसूल व पुनवर्सन विभागामार्फत सन २००४-०५ ते २०१४-१५ या काळात २२.५५ लाख हेक्टर क्षेत्रासाठी ३००३.४५ काेटी तर २०१५-१६ ते २०२४-२५ या काळात १६९.१८ लाख हेक्टर क्षेत्रासाठी १४०३८.५२ काेटी रूपयांची मदत विशेष दाराने दिली आहे. तर निविष्ठा स्वरूपात ६५ हजार ६०१.६८ काेटींचे अनुदान दिले आहे. याशिवाय जमीन आराेग्य पत्रिका अंतर्गत १४ हजार ८०६.९४ काेटी देत अभियान स्वरूपात अंमलबजावणीत देशपातळीवर महायुती सरकार अव्वल असल्याचे साेळंकी यांनी स्पष्ट केले आहे.
ताईच्या विकासकामाचा हा घ्या पुरावा
-9 गावांमध्ये RDSS 33/11 KV विद्युत उपकेंद्र मंजूर
-2 लाख 80 युनिट दररोज क्षमतेचे 22 सोलर पार्क मंजूर
-नोंदीत कामगारांना पेटी वाटप 45 हजार लाभार्थी
-कामगारांना संसारोपयोगी भांडी किटचे वाटप 55 हजार लाभार्थी
-शेतकऱ्यांना नापिकीची मदत 80 हजार लाभार्थी
-PM आवास योजने अंतर्गत 2009 घरकुले मंजूर
-27000+ शेतकरी बांधवांना 23 कोटी रुपये वीज बिल माफ
-आयुष्मान कार्ड संख्या – 44000
-शेतकऱ्यांना मोफत पंप – 4500
-कामगारांना मंजूर घरकुले – 5220
-86 हजार लाडक्या बहिणींना मिळणार दर महिन्याला 1500 रु.
-86 हजार बहिणींना मिळणार वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत
-कृषि यांत्रिकीकरण योजने अंतर्गत 1479 शेतकऱ्यांना मिळाले 8 कोटी रुपये
-प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत 8854 शेतकऱ्यांना मिळाले 11 कोटी 28 लाख रुपये
-प्रत्येक थेंब अधिक पिक योजने अंतर्गत 6441 शेतकऱ्यांना मिळाले 8 कोटी 63 लाख रूपये
-मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत 7924 शेतकऱ्यांना मिळाले 5 कोटी 18 लाख रूपये
-PM किसान सन्मान योजने अंतर्गत 51 हजार शेतकऱ्यांना मिळाले 143 कोटी रुपयापेक्षा जास्त मदत