पेढे भरवून फटाक्याची आतिषबाजी
मानोरा (Devendra Fadnavis) : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची निवड जाहीर होताच ५ नोव्हेंबर गुरूवार रोजी मानोरा येथील झेंडा चौक व छत्रपती महाराज चौकात महायुती आघाडीच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच भव्य फटाक्याची आतिषबाजी करत निवडीचे स्वागत केले.
याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी महादेवराव ठाकरे, डॉ अरविंद यावलकर, डॉ अविनाश लोथे, डॉ सुहास देशमुख, संतोष जाधव, मिलिंद देशमुख, डॉ धामणीकर, डॉ हरिष नवहाल, पप्पु सेठ हेडा, डॉ विशाल यावलकर, गोपाल लढा, ओम बलोदे, अरुण हेडा, मित्तल धोटे, राजु देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे डॉ अशोक करसडे, विनोद राठोड, श्रीधर पाटील, राजु ठाकरे, अशोक जाधव, डीगांबर चतुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे यशवंत इंगळे, गोपाल भोयर, सचिन रोकडे, मनोहर पाटील, संजय भुजाडे, धनंजय वानखडे, विक्रांत देशमुख, आदीसह महायुतीच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.