कळमनुरी (Devendra Fadnavis) : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विराजमान होणार असल्याने कळमनुरी येथील भाजपच्या वतीने चौक बाजार या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ.गजानन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाक्यांच्या अतिश बाजीत जल्लोष करण्यात आला.
कळमनुरी येथे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची महाराष्ट्र विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाल्याबद्दल भाजपाच्यावतीने बुधवार ४ डिसेंबर रोजी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. यावेळी ज्येष्ठ नेते आण्णासाहेब मेने, नंदुसेठ मणियार, शंकर सुर्यवंशी, अशोक संगेकर, प्रकाश नाईक, दिनकर कोकरे, दामोदर शिंदे, चंद्रकांत राऊत, सोनबा बुर्से, आंबादास कल्याणकर, कैलासराव शिंदे, बबन पंचलिंगे, नारायण डुरे, उमेश सोमाणी, राहुल मेणे, विद्याधर मगर, आमिष दरक, विठ्ठल भोयर, हनुमंत सुर्यवंशी, संजय लोंढे, प्रल्हाद देवकते, मारोतराव देशमुख, विलास भोसकर, राजू जाधव, दीपक बेद्रे, बाळू घुसे, सतीश कुलकर्णी, शेख साजिद, अनिस बागवान, इंदेश काबरा, गोविंद मणियार, ओमकार नावडे, भागवत ठाकूर, तुकाराम नाईक, रुखमाराव शिंदे, मसाराव करे, योगेश संगेकर, विकास ठाकूर, शिवाजी मस्के, कुणाल खर्जुले, निलेश जाधव, सागर शिंदे, अनिल इंगळे, मुकेश इंगोले, भीमराव वाढवे, ऐसान सिद्दीकी, रवी सोनटक्के, रमेश पाठक, ओमकार संगेकर, अर्जुन बोरकर, अनुप कंदी, गणेश कड व भारतीय जनता पार्टी कळमनुरी विधानसभाचे प्रदेश पदाधिकारी व बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.