समीर मेघे विक्रमी मतांनी निवडून येणार
वाडी (Devendra Fadnavis) : आमदार झाल्यानंतर समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांनी मतदार संघात झपाटल्यागत विकासकामे केली. ते कार्यसम्राट आमदार आहेत. आपल्या कामांच्या आणि नियमित जनसंपर्काची माध्यमातून त्यांनी हिंगणा मतदारसंघातील लोकांचा विश्वास संपादन केला आहे. या निवडणुकीत ते विक्रमी मतांनी निवडून येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दत्तवाडी परिसरात आयोजित जाहीरसभेत दिली.
हिंगणा विधानसभा क्षेत्राचे भाजप महायुतीचे उमेदवार आ. समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत बोलताना ना. फडणवीस यांनी वाडी स्मार्ट सिटी बनणार असल्याचे जाहीर करीत बुटीबोरी आणि येथील एमआयडीसीमध्ये १ लाख कोटीची कामे करणार असल्याचे सांगितले. तर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या हुशार व होतकरू गरजू मुलींचे शिक्षणशुल्क माफ करण्यात येणार असल्याचा सूतोवाचही (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
या सभेला ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांची विशेष उपस्थिती होती. आ. समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्यासह विनोद सातंगे, सतीश जिंदल, दिवाकर पाटणे, पुरुषोत्तम रागीट, नरेश चरडे, पुरुषोत्तम खोरगडे, आनंदराव कदम, सरिता यादव या नेत्यांची मंचावर उपस्थिती होती. वाडीवासीयांपुढे बोलताना फडणवीस म्हणाले, मी दहा वर्षे या मतदारसंघाचा आमदार राहिलो आहे. त्यामुळे या भागाशी माझा ऋणानुबंध राहिला आहे. समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांनी मतदारसंघात प्रचंड काम केले आहे. अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारने सर्वाधिक त्रास समीर मेघेना दिला होता. अडीच वर्षे त्यांना कुठलाच निधी दिला नाही. त्यानंतर आपले सरकार आल्यावर त्यांनी अक्षरशः ट्वेटी-ट्वेंटी खेळून कसर भरून काढली. हिंगणा मतदारसंघात ८ हजार कोटींची कामे झालीत. ना. गडकरी यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे झाली, असेही (Devendra Fadnavis) फडणवीस म्हणाले.
या सभेपूर्वी आ. समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हिंगणा मतदारसंघातील डिगडोह, संजयनगर, दुर्गानगर, साईनगर, काळमेघनगर, राय टाऊन, पोलीसनगर, वैशालीनगर, एकात्मातानगर या ठिकाणी रॅली काढीत नागरिकांशी संवाद साधला.