एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
मुंबई (Devendra Fadnavis) : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आझाद मैदान, मुंबई येथे पार पडला. महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे (Devendra Fadnavis) देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित आशाताई अनंतराव पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली.
#WATCH | Mumbai: Devendra Fadnavis takes oath as Chief Minister of Maharashtra pic.twitter.com/i14uGpEyr6
— ANI (@ANI) December 5, 2024
आजच्या शपथविधी कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) , केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच डी कुमारस्वामी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय सूक्ष्म मध्यम लघू उद्योगमंत्री जितनराम मांझी, केंद्रीय दळणवळण मंत्री जोतिरादित्य सिंधिया, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते.
या कार्यक्रमात अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगस्वामी, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यु रिओ, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग, केंद्रीय राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, विविध राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वश्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, पवन कल्याण, राजेंद्र शुक्ला, अरुण सावो, विजय शर्मा, प्रेमचंद बैरवा, विजयकुमार सिन्हा, सम्राट चौधरी, कनक बर्धन सिंह देव, प्रवती परिदा, चौना मेन, प्रेसतोन त्यांसोंग, यांथुंगो पटॉन, टी. आर. झेलियांग, एस धार, श्रीमती दिया कुमारी यांच्यासह साधू, संत, महंत, विविध धर्मांचे गुरु, राज्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, उद्योग, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवर, विशेष निमंत्रित अतिथी उपस्थित होते.
#LIVE | मुंबई | श्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी समारंभ@narendramodi @Dev_Fadnavis#Maharashtra #Mumbai #OathCeremony https://t.co/9BiJHjDF2C
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 5, 2024
#WATCH | Maharashtra CM-designate Devendra Fadnavis, Shiv Sena chief Eknath Shinde, NCP chief Ajit Pawar arrive at Azad Maidan in Mumbai for the swearing-in ceremony
(Video source: ANI/ DG-IPR) pic.twitter.com/w9j3bEpl41
— ANI (@ANI) December 5, 2024
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेत. 2014 ते 2019 असा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर 2019 मध्ये ते तीन दिवस मुख्यमंत्री होते. आता 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण 288 पैकी सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत.
Maharashtra CM-designate Devendra Fadnavis, Shiv Sena chief Eknath Shinde, NCP chief Ajit Pawar at Azad Maidan in Mumbai for the swearing-in ceremony pic.twitter.com/6zABctpqce
— ANI (@ANI) December 5, 2024
अशा स्थितीत (Maharashtra Cabinet) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपच्या छावणीतूनच असतील आणि मंत्रिमंडळातही भाजपच्या छावणीतून अधिक मंत्री असतील. महाराष्ट्रातील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10, शिवसेनेच्या 13 आणि भाजपच्या 20 मंत्र्यांची नावे आहेत.
महाराष्ट्र आज एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहे. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत…#शपथविधीसोहळा#SwearingInCeremony#OathCeremony@Dev_Fadnavis pic.twitter.com/pMDlEWFkzR
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 5, 2024