– प्रा. जयंत महाजन
नाशिक (Devendra Fadnavis) : दिल्लीला जाण्याऐवजी (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीसांना नागपूरला येऊन संघ मुख्यालयात हजेरी का लावावी लागत आहे, याबाबत आता चर्चेला ऊत आला आहे. दिल्लीला जाऊन (Modi-Shah) मोदी-शाह यांना भेटण्यापूर्वी संघाने त्यांना तडकाफडकी नागपुरात का बोलावले? संघ, भाजपा संघटन ॲक्शन मोडवर आल्याचे हे सारे संकेत दिसत आहे. या निवडणूकीत (PM Modi) मोदींना झटका बसला असला तरी, ते स्वतः या पराभवाची जबाबदारी घेणारच नाही. कुणाचा तरी राजकीय बळी देऊन ते वेगळी दिशा देतील. त्यामुळे तडकाफडकी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना पराभवाची जबाबदारी घ्यायला पुढे केले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. मोदींना पराभवाची जबाबदारी घ्यायला लागू नये, यासाठी (Yogi Adityanath) योगी आदित्यनाथ यांच्यावर उत्तर प्रदेश पराभवाची जबाबदारी ढकलण्यासाठी मोदी लॉबी कार्यरत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण युपीत तिकीट वाटपापासून सर्व राजकारण अमित शाह (Amit Shah) यांनीच हाताळले होते.
योगिनी सुचविलेल्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवून मोदी-शाह यांनी स्वतःची उमेदवार दिले होते. ते सर्व पराभूत झाल्याची चर्चा यूपीमध्ये होत आहे. याशिवाय योगी ऐवजी मोदी असा चेहरा युपी मध्ये चालला नाही. (PM Modi) मोदी सरकार असा शब्दप्रयोग सतत उच्चारला जात होता. विशेष म्हणजे, संघाची आम्हाला आता गरज नाही. या वाक्याने संघाची देखील झांज उतरली. आता पराभव झाल्यानंतर मोदी सरकार ऐवजी एनडीए सरकार अशी भाषा सुरू झाली आहे. ज्या (Chandrababu Naidu) चंद्राबाबू नायडू ना तुरुंगात डांबले त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले होते. त्यांचेच पुढे नतमस्तक होण्याची वेळ मोदींवर आली आहे. तसेच पलटूराम हा शब्दप्रयोग (Amit Shah) अमित शाह यांनी संपूर्ण बिहारमध्ये प्रसिद्ध केला होता. त्यांचेही पुढे पुढे करण्याची वेळ मोदी-शाह (Modi-Shah) यांना आली आहे.
पंतप्रधानपदी मोदी नको, असा सूर संघात उमटत आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) , शिवराजसिंह चौहान, राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या नावांना संघाची पसंंती दिसत आहे. परंतु संघाची हालचाल वेगात होण्यापूर्वीच सरकार बनविण्याची घाई मोदी-शाह (Modi-Shah) यांना झाली आहे. त्यामुळेच घाईघाईने ते राष्ट्रपती भावनात जाऊन पोहोचले आहे. विशेष म्हणजे सरकार बनविणे अपयश आले तर, अनेकांना तुरुंगात डांबणाऱ्या मोदी-शाह यांच्यावर देखील तीच वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुस्लिमांचे कट्टर समर्थक असलेल्या (Chandrababu Naidu) चंद्रबाबू नायडू यांच्यासमोर त्यांनी सपशेल लोटांगण घातले आहे. ‘जय श्रीराम’ ऐवजी ‘जय जगन्नाथ’ असा नारा देण्यास मोदींनी सुरूवात केली आहे. अतिशय सामान्य वकूबाच्या माणसांसमोर झुकायला त्यांनी सुरूवात केली आहे. या निवडणूकीने मोदी-शाह यांचा अहंकार, माज, मग्रूरी पुरती गायब झाली आहे.
ज्या संघाला त्यांनी डावलले, ज्या सरसंघचालक मोहन भागवत यांना गुंडाळून ठेवले, ज्या भाजप पक्ष संघटनाला फाट्यावर मारले, ते काय आता गप्प बसणार आहेत काय? अयोध्येत पराभव का झाला? याच्याही सुरस कथा बाहेर पडू लागल्या आहेत. स्थानिक लोकांना हद्दपार करून तिथे गुजराती मंडळींना घुसडण्यात आले आहे. सर्व व्यवसाय, ठेके हे गुजराती ठेकेदार, कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. (Chandrababu Naidu) चंद्राबाबू्च्या पुढे पुढे करायला सुरूवात झाली असली, तरी (Akhilesh Yadav) अखिलेश यादव यांच्या ते खास मर्जीतले आहे, हे मोदी-शहांना ध्यानात ठेवावे लागणार आहे. अर्थात राष्ट्रपती सर्वात मोठ्या पक्षाला सरकार बनवण्यासाठी निमंत्रित करणारच आहे. पण सरकार चालवताना आता (Modi-Shah) मोदी-शाह यांना दादागिरीची भाषा करता येणार नाही. तपास यंत्रणांचा गैरवापर करताना दहा वेळा विचार करावा लागेल. कारण (Chandrababu Naidu) चंद्रबाबू नायडू यांना भाजपाने तुरुंगात डांबून झटका दिलेला आहे. कदाचित त्याचे उट्टे फेडण्याची वेळ आली असल्याने भाजपला प्रत्येक पाऊल सावधगिरीनेच टाकावे लागणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील व यूपीतील पराभवाचा दणका लक्षात घेता कुणालातरी बळी द्यावे लागणारच आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांचे नाव आले असावे अशी शक्यता वाटते.