परभणी (Ganesh Chaturthi) : सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी भाविक भक्त सज्ज झाले आहेत. शनिवार ७ सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशी श्री गणेशाचे आगमन होणार आहे. श्रींची मुर्ती खरेदीसाठी तसेच इतर सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी परभणी शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार, वसमत रोड या भागात मुर्तीकारांनी लहान मोठ्या गणेश मुर्ती विक्रीसाठी उपलब्ध करुन दिल्या होत्या.
सार्वजनिक गणेश मंडळांनी अगोदरच मुर्तीची मागणी मुर्तीकारांकडे नोंदविली होती. शुक्रवारी सायंकाळी बाजारपेठेत सजावटीच्या वस्तू, विद्युत रोषणाईसाठी लागणारे दिवे, पुजेसाठी लागणारे साहित्य, फळ खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. घरगुती गणपतीच्या खरेदीकडे नागरीकांचा अधिक ओघ होता. शनिवारी सकाळी साडे सात ते साडे बारा या वेळेत गणपतीच्या स्थापनेसाठी शुभ मुहूर्त आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून (Ganesh Chaturthi) सायंकाळी उशीरापर्यंत श्रींची स्थापना केली जाणार आहे. गणतीच्या आगमनासाठी भाविक भक्त सज्ज झाले असून आनंदीमय वातावरण आहे.
जिल्ह्यात १ हजार ८०८ गणेश मंडळ
शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी सायंकाळ पर्यंत पोलीस प्रशासनाकडे १ हजार ८०८ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंद झाली होती. यामध्ये घरगुती (Ganesh Chaturthi) गणेश मुर्तींचा समावेश नाही. सदर संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
घरगुती गणपतीच्या स्थापनेसाठी सकाळी साडे सात ते सकाळी साडे बारा या वेळेत शुभ मुहूर्त आहे, अशी माहिती पंचांग जानकार सतीश बोथीकर यांनी दिली.
जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त
गणेशोत्सवासाठी परभणी पोलीस दलाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, २० पोनि., ९५ सपोनि, पोउपनि., ८३० अंमलदार, गृहरक्षक दलाचे ७१७ जवान, दंगा नियंत्रणाचे ३ पथक, एसआरपीएफची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.