परभणी (Parbhani):- आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे भाविकांना जाण्यासाठी परभणी आगारातून बसेस पाठविण्यात येत असून वारकर्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
४० बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन
परभणी आगाराच्या वतीने शहरातील तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील भाविक भक्तांना राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporations) जवळपास ४० बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले होते. परभणी बसस्थानकावर(bus station) पंढरपूर येथे जाणार्या ४० ते ४५ भाविक आले असता बस पाठविण्यात येत आहेत. त्यातंर्गत सोमवार १५ जुलै रोजी संपूर्ण दिवसभरात दहा बसेस सोडण्यात आल्या. मंगळवार १६ जुलै रोजी दिवसभरात २० बसेस पंढरपूरकडे(Pandharpur) रवाना झाल्या. तर आज आणि उद्या आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) १० बसेस राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पंढरपूर येथे जाण्यासाठी विशेष बसेस पाठविण्यात येत आहेत. याला परभणी आगार परिसरातील भाविक भक्त, वारकरी, नागरीकांकडून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. यामध्ये महिला, जेष्ठ नागरीकांचा सहभाग जास्त प्रमाणात असून त्यांना मिळणार्या विविध योजनेंच्या माध्यमातून सवलतीचा फायदा मिळत आहे. यामध्ये महिलांना ५० टक्के बस प्रवासात सवलत मिळत असल्याने महिला भाविक भक्त पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत.
भाविकांचा मिळतोय प्रतिसाद
परभणी आगाराच्या वतीने पंढरपूर येथे आषाढी यात्रेला जाण्यासाठी वारकर्यांना जवळपास ४० बस उपलब्ध करून देण्यात येत आहे. सोमवार व मंगळवारी या दोन दिवस भाविकांकडून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत असून जवळपास ३० बसेस पाठविण्यात आल्या आहेत. -दत्तात्र्य काळम, आगार प्रमुख, परभणी.