पोलिस, आरोग्य यंत्रणेसह अनेकजण सज्ज
हिंगोली (Chintamani Modkotsav) : नवसाला पावणार्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पाच्या (Chintamani Modkotsav) दर्शनास व मोदकोत्सवाला लाखो भाविकांचा जनसागर उद्या उलटणार आहे. त्यामुळे भक्तीचा महापूर हिंगोलीकरांना पुन्हा दिसून येणार आहे.
हिंगोली शहरातील गड्डेपीर गल्ली भागामधील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पाची ख्याती (Chintamani Modkotsav) महाराष्ट्रासह इतर प्रांतातही सर्वदूर परिचित आहे. गणेशोत्सवात लाखो भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनाकरीता येतात. त्यानुसार या गणेशोत्सवातही आतापर्यंत लाखो भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले. आज १७ सप्टेंबरला नवसाचा मोदक घेण्याकरीता लाखो भाविकांची मांदियाळी पहावयास मिळणार आहे. त्या निमित्त कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्या निमित्ताने १६ सप्टेंबरला बॉम्बशोधक व नाशक पथकाने मंदिरासह परिसराची पाहणी केली.
सकाळी आरती नंतर ८ वाजल्यापासून भाविकांना नवसाचे मोदक रांगेतूनच दर्शन घेताना मिळणार आहे. (Chintamani Modkotsav) लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस यांनी तीन पथकासह अनेक डॉक्टर व कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे नगर पालिके तर्फे देखील स्वच्छतेसह इतर बाबीवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदीर संस्थानने वॉटरप्रूफ मंडप उभारले आहेत. इतर ठिकाणाहून येणार्या भाविकांसाठी परीवहन मंडळाने जादा बसेसची व्यवस्था केली आहे.
यासोबतच अनेक भाविक रेल्वेनेही हिंगोलीत दाखल होणार आहे. ऑटो संघटना मार्फत रेल्वे स्टेशन व बसस्थानका पासून भाविकांना निशुल्क वाहन व्यवस्था उपलब्ध केली आहे. अनेक दात्यांकडून अन्नदान केले जाणार आहे. (Chintamani Modkotsav) विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पाच्या दर्शनाकरीता लाखो भाविक आज येणार असल्याने हिंगोली शहराला पंढरपूर सारखे स्वरूप प्राप्त होणार आहे. भाविकांच्या सेवेसाठी हिंगोलीकर सज्ज झाले आहेत.