औंढा नागनाथ (Aundha Nagnath) : तिसऱ्या श्रावण सोमवारी नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हिंगोली परभणी नांदेड लातूर वाशिम आदी भागातील भाविकांचाही यात समावेश होता.नागनाथ संस्थानचे अधिक्षक वैजेनाथ पवार, व्यवस्थापक सुरेद्र डफळ यांनी महापूजा केली. महापूजा झाल्यानंतर मध्यरात्री दोनच्या दरम्यान भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. यावेळी (Aundha Nagnath) देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे अध्यक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ , गार्ड प्रमुख बबन सोनवणे कृष्णा पाटील ,नागेश माने ,रामप्रसाद उदगीरे जगदेव दिंडे दिवसभर मंदीरात होते. दिवसभरात लाखो शिवभक्तांनी तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने श्रीचे दर्शन घेतले.
नागनाथ मंदिर बम बम भोले… हर हर महादेव जयघोषाने मंदीरातील वातावरण भक्तीमय झाले होते. (Aundha Nagnath) नागनाथ देवस्थानच्या वतीने शिवभक्तांसाठी साबुदाणा खिचडीची व्यवस्था केली होती दुपारी तीनच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली तरी सुद्धा हजारो भाविकांनी तिसऱ्या सोमवारी नागनाथाचे दर्शन घेतले. बम बम भोले च्या गजरात औंढा नागनाथ नगरी दुमदुमली होती . यावेळी पोलीस निरीक्षक जीएस राहिरे सह पोलीस कर्मचारी यांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.