हिंगोली (Khandoba Yatra) : औंढा नागनाथ तालुक्यातील निशाणा येथे खंडोबाच्या यात्रेला (Khandoba Yatra) प्रारंभ झाला आहे. त्या निमित्ताने अनेक भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. बुधवारी रात्रीच्या सुमारास धगधगत्या आगीतून चालून भाविकांनी आपला नवस फेडला.
निशाणा येथे खंडोबाची यात्रा सर्वदूर प्रसिध्द आहे. या नवसाची लहाड असलेल्या व श्रध्देचा केंद्रबिंदू ठरलेल्या (Khandoba Yatra) यात्रेमध्ये भाविकांनी येळकोट येळकोटचा जयघोष करून खंडोबारायाचे दर्शन घेतले. हजारो भाविक दिवसभर रांग लावून दर्शनासाठी उभे होते. आलेल्या भाविकांनी सुलभ दर्शन मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात आले. आलेल्या भाविकांनी रात्री परंपरेनुसार प्रसादाचे वाटप करण्यात आले. यात्रेमध्ये आ. संतोष बांगर यांनी भेट देऊन खंडोबाचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.