ऋणमोचन यात्रेत भाविकांची पर्वणी!
ऋणमोचनच्या यात्रेत उसळणार जनसागर!
पौष महिन्यातील शेवटचा रविवार
पूर्णेला पाणी, भाविकांची स्नानाची इच्छा पूर्ण होणार!
पूर्णेला पाणी, भाविकांची स्नानाची इच्छा पूर्ण होणार!
भातकुली (Srikshetra Yatra) : पौष महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने विदर्भासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ऋणमोचन येथे मुदगलेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांचा जणसागर उसळणार आहे. यावर्षी (Srikshetra Yatra) यात्रेदरम्यान पूर्णा नदीला मुबलक पाणी असल्याने भाविक अंघोळीचा आनंद घेत असून ओल्या अंगाने मनोभावे मुदगलेश्वराची पूजा अर्चा करतांना दिसून येत आहे. तर, गोवऱ्यांच्या धुरातील रोडग्याचा खमंग स्वाद, अन वांग्याची झणझणीत भाजीवर अनेक भाविक ताव मारणार आहे.
” ब ” दर्जा असलेल्या भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र ऋणमोचन येथे मुदग्लेश्वराचे (महादेव) देवस्थान असून पुरातन आहे. कर्मर्योगी गाडगेबाबा यांनी गृहत्यागानंतर खरी सेवाकार्याची मुहूर्तमेढ ऋणमोचन येथेच रोवली होती. खऱ्या अर्थाने (Srikshetra Yatra) ऋणमोचन ही त्यांची कर्मभूमीच! भातकुली, दर्यापूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्याच्या सिमेवर व अर्ध चंद्राकृती पूर्वाभिमुख वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या काठावर वसलेले श्रीक्षेत्र ऋणमोचन विदर्भासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात श्रीक्षेत्र ऋणमोचन येथे श्रीमुदग्लेश्वराचे (शिवलिंग) पुरातन देवस्थान आहे.
विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या तीर्थक्षेत्री पयोष्णी (पूर्णा) नदी पूर्वाभिमुख व अर्धचंद्राकृती वाहत असल्याने या तीर्थक्षेत्राला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नदीच्या काठावर मुदगलेश्वराचे एक छोटेसे मंदिर आहे. भगवान शंकराचा (महादेव) दिवस सोमवार असला तरी, येथील मुद्गगलेश्वराचा दिवस मात्र पौष महीण्यातील रविवार आहे. त्यामुळे येथे भाविकांची पौष महिन्यात मोठी गर्दी होते. शेकडो वर्षापासून येथे पौष महीण्यात मोठी यात्रा भरते. ती रथसप्तमीपर्यंत असते. (Srikshetra Yatra) पौष महीण्यातील रविवारी पूर्णा नदीत अंघोळ करुन ओल्या अंगाने तांब्याच्या अकरा गडवे टाकून मुद्गगलेश्वराचा जलाभिषेक व बेलपत्री वाहण्याची प्रथा आहे. उद्या दिनांक २६ जानेवारीला पौष महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने व पूर्णा नदीला यावर्षी पाणी मुबलक असल्याने भाविक मोठ्या संख्येने स्नानाचा आनंद घेणार आहे. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. त्यांच्यासाठी ती पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे ऋणमोचन येथे रविवारी भाविकांचा जनसागर उसळणार आहे.
मंदिरावर विद्युत रोषणाई…
ऋणमोचन यात्रा (Srikshetra Yatra) दरवर्षी पौष महिन्यात सुमारे दीड महिना असल्याने मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान, भातकुली पंचायत समिती व नांदेडा ग्राम पंचायत तर्फे भाविकांसाठी विविध सुविधा पुरविल्या जातात. सुरक्षेच्या दृष्टीने भातकुली पोलिस तगडा बंदोबस्त ठेवण्यात येतो.
गोवऱ्यांचा धूर, रोडग्याचा खमंग स्वाद, अन वांग्याची झणझणीत भाजी…
श्रीक्षेत्र ऋणमोचन यात्रेतील (Srikshetra Yatra) खास वैशिष्ट्य म्हणजे गोवऱ्यांच्या धुरातील रोडग्याचा खमंग स्वाद, अन वांग्याची झणझणीत भाजी आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आजही शेतकरी बांधव बैलबंडी घेऊन येथे कुटुंबासह येतात. गोवऱ्यांच्या जगरावर स्वयंपाक करताना. मुदगलेश्वराला नैवद्य दाखवून शुद्ध शाकाहारी रोडग्याचे जेवण करतात. अस्सल ग्रामिण संस्कृतीचे दर्शन घडविणारी ही (Srikshetra Yatra) यात्रा विदर्भासह सर्वदूर राज्यात प्रसिद्ध आहे.