धामणगाव रेल्वे (Dhamangaon Crime) : शहरात भर चौकातुन गोवंशीय जनावरांच्या चोरीची घटना उघडकीस आली होती. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदरच्या गोवंश चोरी प्रकरणात यवतमाळ येथील टोळीला जेरबंद केले आहे. जिल्ह्यात गोवंश तस्करी सोबतच मोकाट व बेवारस जनावरांना जनावरांना रात्रीच्या अंधारात पळवून चोरी घटना वाढ झाली होती. स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी दाखवून या प्रकरणात यवतमाळ येथील टोळी जेरबंद करून चार आरोपी ताब्यात घेतले आहेत. यामध्ये आरोपितांनी जनावरांना चोरीच्या तब्बल ६ घटनांची कबुली दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी
सोमवार ता. २९ जुलै रोजी स्थानिक शिवाजी चौकात परिसरातील बेवारस गौवंशीय जनावरे बसून होती. मध्यरात्रीच्या वेळी भर चौकातील या गौवंशाला चोरीच्या उद्देशाने एका स्कॉर्पिओ चारचाकी वाहनात कोंबून पळवून नेल्याची घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली होती. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान विश्वाहिंदू परिषद, बजरंग दल व गौरक्षा मंच व गौसेवा समितीच्या वतीने तात्काळ कारवाईची मागणी केली जात असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गोवंश तस्करीच्या या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशात केले होते.
यवतमाळचे चौघे आरोपी अटकेत
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक सागर हटवार व त्यांचे पथकाने सदर गुन्हयांचा समांतर तपास केला असता यवतमाळ शहराचे सदर गोवंश तस्करीशी कनेक्शन असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली.दरम्यान यवतमाळ येथून चोरीतील आशीक शहा हसन शहा याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून त्या गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.
यावेळी विश्वासात घेवून कौशल्यपुर्वक विाचारपुस केली असता त्याने त्याचे यवतमाळ येथील साथीदार शेख असरार शेख अकबर, वय ३२ वर्ष, रा. तायडे नगर, समीर खान ईस्माईल खान, वय २८ वर्ष, रा. अशोक नगर, जावेद अहेमद अब्दुल कुरेशी, वय ३९ वर्ष, रा. अशोक नगर यांचे मदतीने सदर गुन्हा केल्याचे कबुली दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद आरोपीतांचा यवतमाळ येथे शोध घेवून त्यांना सुद्धा ताब्यात घेऊन विचारणा केली असता दत्तापूर पोलिसांच्या हद्दीतील गोवंश ३, चांदूर रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील २, नांदगांव खंडेश्वर येथील १ या एकूण ६ गोवंश चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.
आरोपींनी गुन्हयात वापरलेली झायलो गाडी ही पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे गोवंशचोरीचे गुन्हयात जप्त आहे. तर यापुढील आणखी गुन्हयाची उकल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने चारही आरोपितांना पुढील कारवाईसाठी दत्तापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात पो.उप.नि. सागर हटवार, श्रे. पो. उप. नि. मुलचंद भांबुरकर,पोलीस अमंलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, पो. स्टे. सायबर येथील अंमलदार चेतन गुल्हाने, रितेश वानखडे, चालक अंमलदार शाम मते, यांनी केली.