धामणगाव रेल्वे (Dhamangaon Police) : जिल्ह्यातील मंदिरांना टारगेट करून चोरी करणाऱ्या दोन कुख्यात चोरांना (Dhamangaon Crime) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.शहरातील श्वेतांबर जैन मंदिर व दर्यापूर वाशीम येथील मंदिरांच्या दानपेटी फोडून चोरी प्रकरणाचा (crime branch) स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाची उलगडा केला आहे. शहरात २५ जून रोजी मध्यरात्री गांधी चौकातील श्वेतांबर जैन मंदिरातील दानपेटी फोडून दोन अज्ञात चोरट्यांनी जवळपास २० हजार रुपयांचा दानपेटीतील ऐवज लंपास केला होता. दरम्यान शनिवारी २९ जून रोजी मध्यरात्री दर्यापूर येथील मंदिरांमध्ये सुद्धा चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे (Dhamangaon Police) पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या निर्देशावरून गुन्हे शाखेचे विशेष पथक शोध कामी रवाना झाले होते.यादरम्यान सोमवार ०१ जून रोजी अट्टल मंदीर चोरी प्रकरणातील संशयित आरोपी सुरज ठाकुर रा. अकोला हा त्याचा साथीदार सुलतान शेख याचेसह एका मो.सा.वर पो.स्टे. मुर्तीजापुर हद्दीत फिरत असल्याची गोपनीय माहिती (crime branch) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
दुचाकीसह मुद्देमाल जप्त
श्रेणी पोलिस उपनिरिक्षक (Dhamangaon Police) मुलचंद भांबुरकर, पोलीस अंमलदार अमोल देशमुख,मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे यांच्या पथकाने मुर्तीजापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोस्ट ऑफीसजवळ सदरच्या दोन संशयीतांना इग्नेटर लाल रंगाच्या दुचाकीसह ताब्यात घेतले.यातील एकाचे नाव सुरज नवलसिंग ठाकुर वय २१ वर्ष रा. अण्णाभाउ साठे नगर, शिवाजी पार्क अकोला ह. मु. मालोकर हाउस, शिवाजी नगर, मुर्तीजापुर जि. अकोला तर दुसऱ्याने सुलतान शेख रशीद शेख वय २१ वर्ष रा. नई वरसात रलीयाती दाहोद, ता.जि. दाहोद, राज्य गुजरात असे सांगितले. संशयितरित्या फिरणारे दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन मंदीर चोरी संबंधाने विचारपुस करणे असल्याने स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणुन विचारपुस केली असता, त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघानाही विश्वासात घेवुन कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता, धामणगाव रेल्वे शहरातून शाईन मो.सा. कं एम.एच.२७/बी एच ६८१४ व हिरो ईग्नोटोर मो.सा. एम.एच. २७/ए डब्लु २१९२ या दोन दुचाकी चोरी करून जैन मंदीर येथील दानपेटी फोडुन चोरी केल्याचे व तर हिरो ईग्नोटोर घेऊन पसार झाल्याची कबुली दिली आहे.
आरोपीतांनी दर्यापुर येथे जावुन तेथील साईबाबा, खादुश्याम व गणपती असे तिन मंदीरात दान पेटया फोडुन पैसे चोरी केल्याचे सांगीतले व वाशिम जिल्हयातील वाशिम शहर परिसरातील जैन मंदीरातील दान पेटया फोडुन पैसे चोरी केल्याची आरोपींनी दिलेल्या कबुली दिल्याप्रमाणे उघडकीस आलेल्या गुन्ह्यातील त्यांचे कडुन मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत सोबतच अकोला जिल्हयातील मुर्तीजापुर मधील दोन हनुमान मंदीर येथे केलेल्या चोऱ्यांची सुद्धा कबुली दिली असून इतरही चोरी प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही आरोपी त्यांना दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई (Dhamangaon Police) जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद ,स.अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलिस उप निरीक्षक सागर हटवार,श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर,पोलिस अंमलदार अमोल देशमुख,मंगेश लकडे,चंद्रशेखर खंडारे,सचिन मसांगे यांनी केली असून (crime branch) गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.