अनैतिक संबंधातून घडली खळबळजनक घटना
धामणगाव रेल्वे (Dhamangaon Railway Murder) : येथील मध्यरेल्वेच्या रेल्वे रुळावर ब्लॅंकेटमध्ये गाठोड्यात बांधून संशयास्पद स्थितीत (Husband Murder) मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती.दरम्यान बाभूळगाव तालुक्यातील पहूर गावात पत्नीच्या प्रियकराने तिची मदत घेऊन पतीची गळा दाबून हत्या केल्याची घटना (Dhamangaon Police) पोलीस विभागाने काही तासातच उघडकीस आणली आहे. याप्रकरणी दत्तापुर पोलीसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
काही वर्षांपूर्वी बाभुळगाव तालुक्यातील पहूर येथील गजानन नाथ्थूजी राठोड वय ४० याचे विवाह तिवसा तालुक्यातील विरगव्हाण येथे राहणाऱ्या गंगाशी झाला.लग्नानंतर काही काळात कौटुंबिक कारणाने गंगा तब्बल तीन वर्षे माहेरी होती. दरम्यानच्या काळात विरगव्हान येथील शेतमजुरांची मेटकरी करणारा सचिन श्रावण राठोड (३०) याचे गंगाशी सुत जुळले.मात्र गंगाचा कौटुंबिक कलह मिटल्याने ती पुन्हा आपल्या सासरी पोहूर येथे राहायला आली होती.
गळा दाबून मारले व मृतदेह बांधून रेल्वे रुळावर फेकले
अनैतिक प्रेमाच्या धुंदीत असलेला सचिन व गांगाला एकमेकांशिवाय राहणे शक्य नसल्याने सचिन पोहूरला जाऊन तीला भेटू लगला. तीचे सतत फोन वर बोलणे व संशयास्पद वागण्याने यांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण गजाननला लागली होती.त्यामुळे सचिन राठोड व गंगाने संगनमत करून गजानन राठोड याला संपविण्याचा कट रचला.त्यानुसार २० जून रोजी ठरल्याप्रमाणे रात्री गाव झोपेला गेल्यावर सचिन पोहूरला आला.मध्यरात्रीच्या वेळी घरात शिरला गंगाने तिला गजानन कुठे झोपलेला हे दाखवले.सचिनने निद्रावस्थेत असलेल्या गजाननचा गळा दाबून जीवाने मारले. त्याच मध्यरात्री गजाननचा मृतदेह ब्लँकेट मध्ये गाठोड्यात बांधून सचिनने आपल्या दुचाकीने (Dhamangaon Railway) धामणगाव शहर गाठले व बायबास रस्त्यावरील रेल्वे पुलावरून सदरचा गजाननचा (Husband Murder) मृतदेह रेल्वेरुळावर फेकला.
सकाळी रेल्वेच्या कर्मचाऱ्याला गाठोडे रेल्वे रुळाजवळ आढळून आले. याची माहिती धामणगाव येथील रेल्वे सुरक्षा बलाला त्याने दिली. (Dhamangaon Railway) रेल्वे सुरक्षा बल व दत्तापुर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले असता त्यांना गजाननचा हात-पाय बांधून असलेला गाठोड्यातील मृतदेह आढळून आला.त्याच्या खिशातील कृषी केंद्राच्या चिठ्ठीवरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली.दत्तापुर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरविली.या तपासात खून झाल्याचे निष्पन्न झाले.अधिक चौकशीत पत्नी गंगा संशयित म्हणून दत्तापुर पोलिसांच्या नजरेत आली असता कसून तपास करताच आरोपी गंगा व तिचा प्रियकर सचिन या दोघांनी संगनमताने गजाननचा खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याने दत्तापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विष्णुपंत राठोड,चपाईटकर उमेश वाघमारे,पवन हजारे,दीपक पंधरे,पवन हजारे व पवन महाजन व स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीच्या पोलीस पथकाने आरोपी सचिन याला दोन तासातच ताब्यात घेतले आहे.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखा पथक सुद्धा तपासकामी पाठवण्यात आलें होते दरम्यान फिंगर प्रिंट एक्स्पर्ट पाचारण करण्यात आले. दत्तापुर पोलिसांनी प्राथमिक चौकशीत खुनाचा उलगडा केला व आरोपींना ताब्यात घेतले.अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली (Dhamangaon Police) पोलिस निरीक्षक विष्णू राठोड व आदी करीत आहे.दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी आशिष कांबळे यांनी भेट दिली.