तहसिल कार्यालयात एसीबीची कारवाई
धामणगाव रेल्वे (Dhamangaon Railway Talathi) : विकत घेतलेल्या शेतीची फेरफार नोंद घेण्यासाठी चार हजाराची मागणी करणारा (Talathi office) तलाठी प्रफुल थोरात याला पंधराशे रुपयांची लाच घेतांना सोमवारला (ता.८) लाचलुचपत लुचपत विभागाने सापळा रचत रंगेहाथ पकडले. तहसिल कार्यालयात झालेल्या या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
शेतीचा फेरफार नोंदवण्यासाठी केली लाचेची मागणी
प्राप्त माहितीवरून तालुक्यातील महसूल विभागाचा तलाठी प्रफुल पांढुरंग थोरात वय ४४ यांच्याकडे सांझा झाडगाव,तळणी,कासारखेड चा कार्यभार तहसिल कार्यालय दत्तापुर येथे कार्यरत आहे. तक्रारदार प्रफुल्ल महल्ले यांचे सासरे सुनिल शामरावजी काळमेघ यांनी प्रविण रामकिसन जाधव यांचें कडुन मौजा तळणी शेतशिवारातील सर्वे नं. ८/१/ क क्रमांकाची १ हेक्टर ६२ आर शेतजमीन ८ लाख ३० हजार रुपयाने विकत घेतले.सदर शेतजमीन सुनिल काळमेघ यांच्या नावाने फेरफार करण्यासाठी मौजा तळणी गावाच्या तलाठी प्रफुल थोरात यांनी तक्रारदारास महल्ले यांना सुरवातीला ४ हजाराच्या लाचेची मागणी केली होती.
तहसिल कार्यालयात झालेल्या कारवाईने महसूल विभागात खळबळ
महल्ले यांनी ०४ जुलै रोजी यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात (Talathi office) तलाठी प्रफुल थोरात यांची तक्रार नोंदविली असता पडताळणी कारवाई दरम्यान तलाठी थोरात यांनी तक्रारदार महल्ले यांचे सासरे सुनील काळमेघ यांचे शेतीचा फेरफार लवकरात लवकर करून देण्यासाठी तडजोडी अंती पंधराशे रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.सोमवारला (ता.८) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आयोजित सापळा रचून यातील तक्रारदार प्रफुल्ल महल्ले यांचेकडून तलाठी प्रफुल पांढुरंग थोरात (वय ४४) रा. गंगोत्री कॉलनी तपोवन अमरावती याला १ हजार ५,०० रूपये लाचेची रक्कम घेतांना पंचासमक्ष रंगेहात पकडले.
पंधराशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी (Talathi office) तलाठी प्रफुल थोरात याला लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेविरुध्द दत्तापुर पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप,अपर पोलीस अधीक्षक अनील पवार, पोलीस उपअधिक्षक मिलींदकुमार अ. बहाकर यांचे मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी म.पो.नि. चित्रा मेसरे,पोलीस उप अधिक्षक मंगेश मोहोड,पोलीस अमंलदार प्रमोद रायपुरे,शैलेश कडू,नितेश राठोड व वाहन चालक पो.हवा. जनबंधु या पथकाने पार पाडली.नागरीकांनी अशाच प्रकारे भ्रष्टाचारा संबंधी व कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ माहिती देऊन तक्रार करावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.