धामणगाव रेल्वे (Dhamangaon Revenue) : तळेगाव दशासर पोलीस स्टेशनच्या (Dashasar police) हद्दीत असलेल्या धामक बेलोरा शेत शिवारातील पांधन रस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी (Revenue Dept) महसूल यंत्रणेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.दरम्यान सदरच्या शासकीय पथकाशी वाद घालून अडथडा करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी धामकच्या सरपंचासह सहा आरोपिवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव दशासर पोलिसांच्या हद्दीतील घटना
माहितीवरून, तळेगाव दशासर पोलीस स्टेशनच्या (Talegaon Dashasar police) हद्दीत येणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा धामक येथील नवीन गावठाण ते कु-हेगाव पांधन रस्ता मोकळा करून देणे बाबत नांदगाव खंडेश्वर तहसीलदार यांनी २० मे २०२४ रोजी तलाठी सचीन फुटाणे यांना आदेशीत केले होते. दरम्यान २२ मे रोजी तलाठी सचिन फुटाणे, मंडळ अधिकारी दिप्ती पवार व तलाठी प्रविण गोविंदराव रावेकर व कोतवाल अरूण नगराळे या पथकाने पोलीस संरक्षणामध्ये सदर पांदण रस्त्याचे अतीक्रमण काढणे करीता दुपारी १२ च्या दरम्यान मौजा धामक येथील गट क्र ११५/२ या शेताला लागुन असलेल्या पांदण रस्त्याचे तारेचे कम्पाउंडचे अतीक्रमण काढणे करीता जेसीबी घेवून गेलो असता तेथे अगोदरच गजानन साहेबराव बुरे रा. धामक हा शेतामध्ये हजर होता. (Encroachments) अतीक्रमणचे काढण्याचे काम सुरू असतांना गजानन बुरे हा तिथे आला व त्यांने महसुल विभागच्या पाथकाशी शाब्दीक वाद सुरु केला. तरी आमचे काम सुरु होते काही वेळाने तीथे धामक गावाचे सरपंच जयदीप महेंद्र काकडे यांना सोबत घेऊन हेमंत उर्फ हनुमान संदाशिव बुरे,निर्मल भोईर,वसंत नारायण बावणे,भावना हेमंत उर्फ हनुमंत बुरे सर्व रा. धामक हे पोहचले आले. नियमाप्रमाणे शासकिय कर्तव्य बजावित असतांना या सर्वांनी आम्हास अतीक्रमण काढणेस मनाई करून शासकिय कामात अडथळा निर्माण केला.
धामकच्या सरपंचासह सहा जणांवर गुन्हा दाखल
शिवीगाळ करून जेसीबी जाळून टाकु, (Encroachments) अतीक्रमण काढले तर एकाएकाला जेसीबी समोर टाकून मारून टाकू अशी धमकी दिली. त्यांनी शासकिय कामात अडथळा निर्माण केला घाबरलेल्या महसुल पथक काम अपुरे सोडुन परत निघून गेलो सदर घटनेबाबत तलाठी सचिन फुटाणे यांनी नांदगाव खंडेश्वर तहसीलदार यांना लेखी कळविले असता त्यांच्या आदेशाने तलाठी फुटाणे यांच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलीस स्टेशन येथे गजानन साहेबराव बुरे वय ३० वर्ष, हेमंत उर्फ हनुमंत बुरे ५८ वर्ष, निर्मल भोयर वय ३५ वर्ष, जयदिप महेंद्र काकडे वय ३० वर्ष, वसंत ना वय ५५ वर्ष, भावना हेंमंत उर्फ हनुमंत बुरे वय ५० वर्ष सर्व रा धामक यांनी गैरकायदयाची माणसे जमवुन सरकारी कामात अडथळा निमार्ण करून शिवीगाळ करून जेसीबी मशीन समोर टाकुन जीवे मारण्याची धमकि दिल्याच्या लेखी तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी (Talegaon Dashasar police) ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्यासह तळेगाव दशासर पोलीस पुढील तपास करीत आहेत.