धनगर समाजाचे आंदोलन आक्रमक वळणावर
लातूर (Dhangar Samaj Andolan) : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस. टी) प्रवर्गात समावेश अध्यादेशाचा अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी (Dhangar Samaj Andolan) धनगर समाजाने लातूर मधून निर्णायक लढ्याची हाक देत आंदोलन सुरू केले आहे. सामाजिक कार्यकर्ते मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल भोयकर यानी आमरण उपोषणास सुरुवात केली धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले एसटी आरक्षण तात्काळ लागू करावे, अन्यथा जीव गेला तरी माघार नाही अशी आक्रमक भूमिका मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी आमरण उपोषणाच्या १६ व्या दिवशी घेतली आहे.
९ सप्टेंबर रोजी अनिल गोयकर व चंद्रकांत हजारे यांनी आमरण उपोषण सुरु केले असून उपोषणाचा आज १६ वा दिवस आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज मागील ७० वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली, अनेक मोर्चे झाले आणि उपोषणे झाले; अनेक वेळा साखळी उपोषण, रास्तारोको, मुंडण आंदोलन, निवेदने, सभा, रेल रोको आंदोलने झाले तरी सुद्धा सर्वच सत्ताधारी पक्षांनी (Dhangar Samaj Andolan) धनगर समाजाची फसवणूक केली आहे. आजपर्यंत सरकार कडून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. त्यानंतर धनगर समाजाच्या सुरु असलेल्या उपोषणाला समाजातून पाठिंबा देत राज्यभरात रस्ता रोको, निवेदन आंदोलन करण्यात येत असून कांही ठिकाणी धनगर समाज आक्रमक झालेला ही दिसत आहे. आता जीव गेला तरी माघार नाही, असा आक्रमक पवित्रा मल्हारयोद्धा अनिल गोयकर चंद्रकांत हजारे, यांनी घेतला आहे.
आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले
महाराष्ट्रातील धनगर समाज (Dhangar Samaj Andolan) मागील ७० वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची प्रमुख मागणीसाठी लातूरमधील मल्हार योध्ये चंद्रकांत हजारे व अनिल गोयेकर यांनी सुरूवात केलेले आंदोलनाचे लोण आता राज्यभर पसरले आहे. राज्यातून विविध स्तरातून हे आंदोलनं केली जात असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंढण आंदोलन, रास्तारोको, अशी आंदोलन केली जात आहेत. या आंदोलनात संपूर्ण (Dhangar Samaj Andolan) धनगर समाज बांधव एकवटलेला दिसून येत आहे.