लातूर (Dhangar Samaj Reservation) : सन २०१४ मध्ये सत्तेवर येताना भाजपने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Dhangar Samaj Reservation) धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करू, अशी ग्वाही दिली होती. गेल्या दहा वर्षांत त्याची अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे एसटी आरक्षणाचा जीआर निघाल्याशिवाय उपोषण आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा असा निर्वाणीचा इशारा देत धनगर समाजाचे उपोषण आंदोलन (Hunger strike) सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या बैठकीत समिती स्थापन करुन आठ दिवसांत अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भ्रमणध्वनी वरून उपोषणकर्त्यांशी चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. परंतु अकरा दिवसांपासून धनगर समाजाचे अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला. (Dhangar Samaj Reservation) धनगर समाज राज्यात लोकसंख्येच्या तुलनेत क्रमांक दोनचा आहे. असे असतानाही केवळ राजकीय हेतूसाठी प्रत्येक सरकारने धनगर समाजाची दिशाभूल व फसवणूकच केली आहे. असा आरोप देखील मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर यांनी यावेळी केला.
सरकारने आश्वासन देण्याऐवजी एसटी आरक्षणाचा जीआर काढावा – आंदोलक
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुंबईत घेतलेल्या बैठकीत (Dhangar Samaj Reservation) सकल धनगर समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत बसवू, असे आश्वासन दिले. मात्र मागील सत्तर वर्षांपासून प्रत्येक सरकारकडून आम्ही हेच शब्द ऐकतोय, मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आश्वासन देण्याऐवजी एसटी आरक्षणाचा जीआर काढावा अशी मागणी ही यावेळी उपोषणकर्ते मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी केली.
धनगर बांधवांनी एकमेकांतील मतभेद – वादविवाद विसरून (Dhangar Samaj Reservation) धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण (Hunger strike) करणाऱ्या उपोषणकर्त्यांना पाठबळ द्यावे, ते तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी उपोषण आंदोलन करत आहेत. सरकारने ही धनगर समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय दिला पाहिजे. राष्ट्रीय संत संदेश पक्ष धनगर समाजाच्या सोबत आहे.
– राजेंद्र वनारसे, अध्यक्ष, राष्ट्रीय संत संदेश पक्ष