परभणीत धनगर समाजाच्या वतीने भव्य सत्कार
परभणी (Dhangar Samaj) : धनगर समाज हा भोळा समाज आहे. ज्याच्या पाठीशी एकदा उभा टाकला व शब्द दिला की तो कुठलाही विचार करत नाही. परभणी जिल्ह्यातील धनगर समाज (Dhangar Samaj) हा महायुती सोबत राहिल्याने जिल्ह्याला तीन आमदार मिळाल्याची आठवण विधान परिषदेचे सभापती ना. पा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी करून देत समाजाची बाजू मांडली.
परभणी येथील सकल धनगर समाजाच्या (Dhangar Samaj) वतीने भाजपाचे सुरेश भुमरे यांनी सभापती ना.राम शिंदे यांचा भव्य सत्कार सोहळा ठेवला होता. या सत्काराला उत्तर देतांना ना. शिंदे (Ram Shinde) हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, पालकमंत्री ना.मेघना बोर्डीकर, आ.डॉ.रत्नाकर गुट्टे, आनंद भरोसे, आर.बी.घोडके, मारोतराव बनसोडे, हरीभाऊ शेळके, आत्माराम पवार, अशोक काकडे, दिनकरराव वाघ व इतर समाजाचे प्रमुख नेते उपस्थित होते. पुढे बोलतांना ना.शिंदे म्हणाले की, धनगर समाजाने यावेळी राज्यात महायुतीला सहकार्य केले आहे. समाजावर नेहमी अन्याय होत आला आहे.
धनगर समाजाच्या (Dhangar Samaj) आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. मी त्या पदावर बसलो आहे. त्याचा फायदा नक्कीच समाजाला व राज्याला होईल, याची काळजी घेतली जाईल. समाजाने याच पध्दतीने येणार्या स्थानिक स्वराज्य निवडणूकीतही आपली भूमिका महायुतीसोबत ठेवावी, असे आवाहन ना.शिंदे यांनी समाजाला केले. या प्रसंगी ना.बोर्डीकर यांनी आपल्या मनोगतामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा व स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले. तसेच रामप्रसाद बोर्डीक, आ.डॉ.रत्नाकर गुट्टे, आनंद भरोसे यांनी आपले मनोग व्यक्त केले. या सत्कार सोहळ्याला मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
सुरेश भुमरे यांना संधी द्यावी
सभापती ना. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या सत्कार सोहळ्यात अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरेश भुमरे हा तळमळीचा कार्यकर्ता आहे. पक्ष वाढीसाठी खूप कष्ट घेतो याची आठवण करून दिली. त्यांची एक संधी आमदारकीची हुकली आहे. परंतू येणार्या काळात त्यांना संधी देऊन (Dhangar Samaj) समाजाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली.