जिल्हा गाठण्याकरिता राजुरा बल्लारपूर मार्ग मोकळा
चंद्रपूर/कोरपना (Dhanora Bhoigaon bridge) : जिल्यात मागील आठवड्या भरापासून सतत धार पावसाने हजेरी लावली असून नदी नाले ओसांडून वाहत आहे. मात्र कोरपणा तालुक्यात रिमझिम पावसाची हजेरी असल्याने सध्या तरी कुठेही पूर परिस्थिती जाणवत नाही. मात्र जिल्ह्याला जोडणारा गडचांदूर (Dhanora Bhoigaon bridge) भोयगाव – घुघूस चंद्रपूर मार्ग (Chandrapur Marg) ठप्प झाला आहेत चंद्रपूर जाणारा भोयेगाव धानोरा या पुलावरून आज सकाळपासून पाणी ओसाडून वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
त्यामुळे परिसरातील गावातील संपर्क तुटला आहे. मागील तीन दिवसांपूर्वी सुद्धा यावं पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला होता. पावसाचा ओस कमी होतास दोन दिवसांपूर्वी पुलावरून वाहतूक सुरू झाली. मात्र आणखी या दोन दिवसात दिवस रात्र सततदार पावसाने हजेरी लावल्याने आज पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे थेट जिल्हा गाठण्याकरिता प्रवासी व नागरिकांना राजुरा बल्लारपूर मार्गे चंद्रपूर गाठावे लागत आहे गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम आपल्या पथकासह (Dhanora Bhoigaon bridge) भोयेगाव पुलावरील सातत्याने आढावा घेत असून पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे.