पुसद (Yawatmal) :- पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खडकदरी येथील एका व्यक्तीच्या घरी धारदार तलवार (sword) असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यांमार्फत दि. 10 नोव्हेंबर रोजी ग्रामीण पोलिसांना मिळाली.
सर्वच प्रशासन ॲक्शन मोडवर
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Elections)पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा मतदारांना निर्भयपणे लोकशाहीच्या उत्सवांमध्ये शांततेत सहभाग घेता यावा याकरिता सर्वच प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून पोलीस प्रशासन ही ॲक्शन मोडवर आहे. तातडीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय शेख मसूद, पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे यांनी तातडीने खडकदरी गाठून गंगाधर मारोती पिपरे वय 24 वर्ष रा. खडकदरी याच्या घराची झडती घेतली असता एक जुनी घातक धारदार तलवार मिळून आले. यावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार सुरेंद्र राऊत, एएसआय शेख मसूद व पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे यांनी केली.