उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करत मागण्यांकडे वेधले लक्ष
परभणी (Dharne Andolan) : संगणकीकरण संस्थांना लागणारा खर्च सचिवांना मिळणार्या वेतनातून भागत नाही. सध्याची वाढलेली महागाई व कुटूंबाचा खर्च पाहता. संगणकीकरण संस्थांना कामकाजाबाबत वार्षिक खर्चाची तरतुद करावी. प्रत्येक महिन्याला सदरचा खर्च देण्याचे प्रयोजन करावे या मागणीसाठी परभणी व हिंगोली जिल्हा गटसचिव कर्मचारी संघटना लाल बावटाच्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Dharne Andolan) व बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
गटसचिवांना न्याय द्यावा, नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्याचे वेतन काढावे, जिल्हा देखरेखने नियमित मागणी, नियमित पगार करावा, गटसचिवांची आर्थिक अडचण सोडवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांकडे वेधले लक्ष
सहावा वेतन आयोग लागु करावा, संगणकीकरण संस्थांना कामकाजाबाबत वार्षिक खर्चाची तरतुद करावी, नोव्हेंबर व डिसेंबरचे वेतन सरसकट अदा करावे, ताळमेळ केलेल्या संस्थेला देऊ केलेले खर्चासाठी प्रति संस्था पाच हजार रुपये अद्याप दिले नाहीत ते देण्यात यावे. जिल्ह्यातील गटसचिवांचा थकीत पगार काढावा या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. (Dharne Andolan) मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.