कोल्हापुर येथील घटनेचा निषेध, समाजकंटकांवर कारवाईची मागणी
परभणी (Muslim community Andolan) : कोल्हापुर जिल्ह्यातील विशालगड व गजापुर येथे काही जातीयवादी लोकांनी मुस्लीमांचे धार्मिक स्थळ असलेल्या मस्जीद, दर्गा तसेच सामान्य लोकांच्या घरावर भ्याड हल्ला केला. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या हिंसाचारा विरोधात शुक्रवार १९ जुलै रोजी परभणी शहरातील उपोषण मैदानावर धरणे आंदोलन (Muslim Andolan) करण्यात आले. आंदोलन कर्त्यांनी समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशालगड येथील जामा मस्जीदवर हल्ला करण्यात आला. तसेच मुस्लीमांच्या घरांची, वाहनांची तोडफोड करण्यात आली. या (Muslim community) हिंसाचाराच्या विरोधात परभणी शहरात शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. दुपारी अडिच वाजेच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली.
मुस्लीम समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
कोल्हापुर येथील घटनेच्या निषेधार्थ एआयएमआयएम परभणी युनिटच्या वतीने धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली होती. शुक्रवार असल्याने दुपारी अडिचच्या नंतर आंदोलन सुरू झाले. उपोषण मैदान येथील आंदोलनाला मोठ्या संख्येने (Muslim community) मुस्लीम समाज बांधवांनी हजेरी लावली. यावेळी समाजातील धर्मगुरु, प्रतिष्ठीत नागरीकांनी जनसमुदायाला मार्गदर्शन केले. (Muslim Andolan) आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. हिंसाचार करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बाबत एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश, गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.