हिंगोली (Hingoli) :- येथील गांधी चौकात आज पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी ऑक्सिजन फक्त झाडांपासूनच मिळतं हे दाखविण्यासाठी प्रतिकात्मक ऑक्सिजन मास्क (Oxygen mask) लावून जनजागृती करण्यात आली. झाड म्हणजे जीवन, विविध प्रकारची देशी आणि जैवविविधता राखणारी झाड लावली पाहिजे ती जोपासली पाहिजे.
जायन्ट्स ग्रुप ऑफ हिंगोली, सदभाव सेवाभावी संस्थेचा पुढाकार..
प्लास्टिकचा (Plastic) वापर कमीत कमी करावा,स्वच्छता राखावी.वायू, जल, जमीनीच प्रदूषण टाळाव, कचरा जाळू नये, पिण्याचे पाणी फक्त पाऊसातूनच मिळतं म्हणून पाणी जपून वापराव, रेन वॉटर हार्वेस्टिंग, रुफ वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाण्याचं संकलन, नियोजन कराव याविषयीं जनजागृती करण्यासाठी जायन्ट्स ग्रुप ऑफ हिंगोली, सदभाव सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला. यावेळी उपस्थितानी झाड जगविण्याची शपथ घेतली. तसेच काही झाड वाटपही करण्यात आली. महात्मा गांधी पुतळा परिसरात फेरी मारून घोषणा देतं आणि झाडांचं महत्व मानवजातीच्या अस्तित्वासाठी किती महत्वाचं आहे. याची माहिती पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. झाड आपल्याला ऑक्सिजन देतात, फळ देतात, औषधं देतात, सावली देतात, लाकूड देतात, प्रदूषण कमी करतात, जीव जंतू प्राणीमात्राला निवारा देतात, पाऊस देतात,पाणी संचय करतात, जमीन सुदृढ ठेवतात, निसर्ग चक्र, जैवविविधता अबाधित ठेवतात. हा संदेश देण्यात आला.
यावेळी डॉ. अभयकुमार भरतीया, रत्नाकर महाजन, आशिष पिंगळकर, डॉ. गणेश अवचार, कांताशेठ गुंडेवार, हर्षवर्धन परसवाळे,किरण लाहोटी, डॉ. भूपाल दोडल,सुदर्शन महाजन, विजय ठाकरे,बाबा घुगे, श्याम स्वामी, महेश शहाणे,पुरुषोत्तम अग्रवाल, ऋषिकेश देशमुख,कौशल खंडेलवाल,विकी गोरे,गजानन बासटवार, जाधव, संतोष अग्रवाल,अनिल सोनी यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.