नवेगावबांध (Diarrhea patients) : मागील दोन दिवसांपासून नवेगावबांध येथे (Diarrhea patients) अतिसाराची लागण सुरू झाली आहे. काल (ता.३१) जवळपास १५ ते १६ रूग्ण ग्रामीण रूग्णालयात दाखल होताच आरोग्य यंत्रणेसह ग्राम पंचायत यंत्रणेत एकच खळबळ उडाली. दरम्यान तुर्त या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अतिसार मागचे कारण लक्षात घेवून योजनेचा (water supply) पाणी पुरवठा बंद करण्यात आला. असे असले तरी सायंकाळपर्यंत रूग्णांच्या संख्येत वाढ होऊन ५० ते ६० रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. एंकदरीत परिस्थिती नियंत्रणात असली तरी वाढती रूग्णसंख्या चिंता निर्माण करीत आहे.
पावसाळ्यात संसर्गजन्य आजाराचा धोका वाढतो. या दृष्टीकोनातून आरोग्य विभागासह पाणी पुरवठा व स्थानिक स्वराज्य संस्था कामाला लागतात. मात्र प्रादेशिक पाणी पुरवठा विभागाने या बाबीची दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे. योजनेच्या दुषित पाणी पुरवठ्यामुळे नवेगावबांध येथे दोन दिवसांपूर्वी अतिसाराची लागण सुरू झाली. १५ ते १६ रूग्ण हागवण, उल्टीच्या आजाराने ग्रस्त झाल्याने त्यांना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे (Diarrhea patients) अतिसाराची लागण सुरू झाल्याची बाब समोर आली. दरम्यान आरोग्य विभागाकडून या बाबीची दखल घेवून नवेगावबांध येथे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. त्यात दुषित पाणी पुरवठा (water supply) होत असल्याने अतिसाराची लागण सुरू णाल्याचे सर्वेक्षणात समोर आले. त्यातच सायंकाळ होईपर्यंत पुन्हा ५० ते ६० रूग्णांची वाढ झाली आहे.
प्रादेशिक पाणी पुरवठा विभागाने दखल घ्यावी
अतिसाराचा (Diarrhea patients) संभाव्य धोका लक्षात घेत ग्राम पंचायत व्यवस्थापनाने पाणी पुरवठा बंद केला आहे. त्याचप्रमाणे खांबी, सिरेगाव प्रादेशिक (water supply) पाणी पुरवठा योजनेची खबरदारी घेवून उपाययोजना करण्यात यावी, अशा सुचना ग्राम पंचायत प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दुषित पाण्याचा वापर करू नये, असेही आवाहन ग्राम पंचायत प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
आरोग्य विभागाची चमु घरोघरी
अतिसाराचे रूग्ण (Diarrhea patients) आढळताच आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. दरम्यान आरोग्य विभागाकडून पथक कार्यरत करून सर्वेक्षण सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे घरोघरी जावून अतिसारपासून दूर राहण्यासाठी पाणी उकळून प्यावे, असा सल्ला दिला जात आहे. तसेच (water supply) पाण्याचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविले जात आहेत.
इंदिरानगर व आकर मोहल्ल्यात रूग्ण
नवेगावबांध येथे मागील दोन दिवसांपासून अतिसाराची लागण सुरू आहे. विशेष म्हणजे, इंदिरानगर व आकर मोहल्ला प्रभाग क्र.३ व ४ येथे ५० ते ६० रूग्ण आढळले आहेत.
दुषित पाण्याचा वापर करू नये, ग्राम पंचायत प्रशासनाकडून एटीएमच्या माध्यमातून नि:शुल्क शुध्द पाणी पुरवठा (water supply) करण्यात येणार आहे.
– हिराताई पंधरे, सरपंच नवेगावबांध