प्रशांत खंडारे यांची तालुका अध्यक्षपदी वर्णी!
बुलढाणा (Digital Media Council) : प्रत्येकांसाठी झटण्यासाठी आपले पाऊल पुढे ठेवणारी अर्थात पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेची (Digital Media Council) बुलढाणा जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. या कार्यकारणीत बुलढाणा तालुकाध्यक्षपदी प्रशांत खंडारे (Prashant Khandare) यांची निवड झाली आहे.
डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात तथा (Digital Media Council) डिजिटल मीडिया परिषदेचे विभागीय सचिव जितुभाऊ कायस्थ यांच्या नेतृत्वाखाली मीडिया परिषदेने उर्वरित कार्यकारणी घोषित केली. यामध्ये, जिल्हा उपाध्यक्षपदी मेहकर येथील बाळू वानखेडे तर संघटक म्हणून चिखलीचे इस्तेखार खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
समाजाचा आरसा ठरलेल्या पत्रकारांचे जगणे स्थिर करण्यासाठी, इतकेच नाही तर त्यांच्या समस्येवर निराकरण करीत जगण्याची नवीन उमेद देण्यासाठी मराठी पत्रकार परिषद अविरतपणे काम करीत आहे. राज्यात मराठी पत्रकार परिषदेचा विस्तार सर्व दूर होत असून, बुलढाणा जिल्ह्यातही संघटनेचा विस्तार जोमाने सुरू आहे. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीत सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाने तसेच (Digital Media Council) डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडियाची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये, झी 24 तास या वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी मयूर निकम यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
सचिव पदी नवराष्ट्र न्यूज चॅनलचे दीपक मोरे, उपाध्यक्षपदी ओटीटी मराठीचे किशोर खंदारे, घाटाखालील जिल्हाध्यक्ष म्हणून श्रीधर ढगे यांची नेमणूक करण्यात आली. तदनंतर, डिजिटल मीडिया परिषदेच्या (Digital Media Council) जिल्हा कार्यकारिणीने उर्वरित कार्यकारणी घोषित केली. यामध्ये, उपाध्यक्ष म्हणून बाळू वानखेडे, जिल्हा संघटक पदी इफेतखार खान, प्रसिद्धी प्रमुख ॲड. संदीप मेहत्रे, जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून महत्त्वाची धुरा गणेश सवडतकर यांच्याकडे सोपविण्यात आली. समन्वयक पदी योगेश शर्मा,बुलढाणा तालुका अध्यक्षपदी प्रशांत खंडारे (Prashant Khandare) तर चिखली तालुकाध्यक्षपदी छोटू कांबळे, लोणार तालुकाध्यक्षपदी संदीप मापारी, सिंदखेडराजा तालुकाध्यक्षपदी राहुल झोटे तसेच देऊळगाव राजा तालुक्याचे अध्यक्ष म्हणून अशोक जोशी यांची निवड करण्यात आली आहे.