अर्जुनी मोर (Dilip Bansod) : अर्जुनी मोर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सुभाषचंद्र बोस पतसंस्था गौरनगर” येथील सभासदांचे पैसे मागील २०१९ पासून संस्थेकडे प्रलंबित होते.. ते पैसे देण्याकरिता पतसंस्था टाळाटाळ करत होते. या विषयाला धरून मा. दिलीपजी बन्सोड (Dilip Bansod) जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमेटी गोंदिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून संबंधित पतसंस्थेवर कारवाई करण्यास भाग पाडले.
परिणामी तेथील ठेवीदारांना प्रत्येक्षात थकीत असलेली रक्कम देण्यात आली.. त्यावेळी स्वतः मा. दिलीपजी बन्सोड (Dilip Bansod) जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमेटी गोंदिया, सोबत घनश्यामजी धामट अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी अर्जुनी/मोर, प्रमोदजी पाऊलझगडे समन्वयक विधानसभा अर्जुनी/मोर, सर्वेशजी भुतडा नगरसेवक अर्जुनी/मोर, संजयजी नाकाडे, कृष्णाजी शहारे शहर अध्यक्ष अर्जुनी/मोर, भुदेवजी पाईक तथा आदी खातेधारक उपस्थित होते.