बुलडाणा (Dilip Kumar Sananda) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची तिसरी यादी जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीनिशी आज शनिवार २६ ऑक्टोबर रात्री पावणे११ वाजता जाहीर झाली, त्या यादीत जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीपकुमार सानंदा (Dilip Kumar Sananda) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत, सकाळीच जळगाव जामोद मतदारसंघातून स्वातीताई वाकेकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. यापूर्वी चिखलीतून राहुल बोंद्रे तर मलकापूर मधून राजेश एकडे यांना उमेदवारी मिळाली आहे.
२०१९च्या ब्रेकनंतर दिलीपकुमार सानंदा (Dilip Kumar Sananda) २०२४ला पुन्हा एकदा काँग्रेस कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी आहे विद्यमान आमदार तथा २०१४ च्या निवडणुकीत ज्यांनी त्यांचा पराभव केला होता, ते आकाश पांडुरंग फुंडकर.
काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेले दिलीपकुमार सानंदा (Dilip Kumar Sananda) हे युवक काँग्रेस व वेगळा विदर्भ चळवळीतून वर आलेले नेतृत्व असून, काँग्रेसने सर्वप्रथम त्यांना १९९९च्या निवडणुकीत खामगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, त्यावेळी त्यांनी नानाभाऊ कोकरे यांचा पराभव करत पहिल्यांदा विधानसभेची पहिली चढली. नंतर २००४ व २००९च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते, २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. २०१९ च्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतल्यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांना काँग्रेसने निवडणूक रिंगणात उतरले होते. तब्बल १० वर्षाच्या ब्रेकनंतर ते पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, अखेरच्या क्षणी काँग्रेसने त्यांना रिंगणात उतरवले आहे. (Dilip Kumar Sananda) सानंदा यांच्या निवडणूक रिंगणातील प्रवेशामुळे खामगाव मतदार संघात प्रचारादरम्यान वेगळा “जलवा” बघायला मिळू शकतो !




