संबंधित मदतनीसांनी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा
प्रलोभन दाखविण्याचा प्रकार झाल्यास तक्रार करावी
हिंगोली (Anganwadi Sevika) : महिला व बालकल्याण विभागांकडील दि. 27 फेब्रुवारी, 2024 च्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी मदतनीस पदांमधून विहित शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या सेवा ज्येष्ठ मदतनीसांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देण्याच्या सूचना प्राप्त आहेत. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पात्र अंगणवाडी मदतनीस यांना रिक्त असलेल्या (Anganwadi Sevika) अंगणवाडी सेविका या पदावर थेट नियुक्ती देण्याची प्रक्रिया बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) यांच्यामार्फत सुरु करण्यात येत आहे.
संबंधित गावातील (Anganwadi Sevika) अंगणवाडी मदतनीसांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच कार्यालय किंवा त्रयस्थ व्यक्तीकडून कोणतेही प्रलोभन दाखविण्याचा प्रकार झाल्यास मदतनीसांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली व जिल्हा परिषद कार्यालय, हिंगोली येथे तक्रार करावी, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.