हिंगोली तहसीलमध्ये आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन
हिंगोली (Hingoli Tehsil) : महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय हिंगोली येथे सकाळी ११ वाजता ‘लोकाभिमुख कामाचा करूया निपटारा चला करू महसूल पंधरवाडा साजरा’ या कार्यक्रमानिमित्त आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन या कार्यक्रमाचे कार्यालय (Hingoli Tehsil) हिंगोली येथे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. के. कोकरे नायब तहसीलदार तसेच या कार्यक्रमाला लाभलेले डॉक्टर संजय नाकाडे व वसंत मोरे तसेच प्रा. ज्योतीपाल खडसे, सुनिता सोनटक्के आणि प्रहार जनशक्ती जिल्हा संघटक हिंगोलीचे विलास आघाव व प्रमुख पाहुणे म्हणून श्याम रॅचेवाड जिल्हा सांकेतिक अधिकारी, रॉबर्ट बांगर प्रहार जनशक्ती जिल्हा हिंगोली, डॉक्टर शिरीष वाढवे, राजू बांगर जिल्हाध्यक्ष जिल्हा संघटक, विष्णु शिंदे, उमेश पाटील, सर्पमित्र पारवेकर महाराज, धम्मदीप पाटील उमेश पाटील, अजिंक्य सोनटक्के, शेख सलीम व हिंगोली तालुक्यातील तहसील कार्यालय हिंगोली (Hingoli Tehsil) येथे सर्व सर्पमित्र कार्यक्रमास उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीमध्ये उद्भवणार्या अडचणी यामध्ये काय करावे व काय करू नये या संदर्भामध्ये डॉक्टर नाकाडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच मोरे यांनी मार्गदर्शन केले. सुनिता सोनटक्के सर्पमित्र यांनी सुद्धा नैसर्गिक आपत्ती संबंधित मार्गदर्शन केले. पेशकार संजय घुगे यांनी सुत्रसंचलन केले तसेच आभार प्रदर्शन सुधाकर सराटे महसूल सहाय्यक यांनी केले. या कार्यक्रमासाठी पारिस्कर मंडळ अधिकारी , नाईक, राठोड, विनोद चव्हाण, वैजनाथ मगर, सर्व कार्यालयीन कर्मचार्यांनी सहभाग नोंदविला व यशस्वीरीत्या कार्यक्रम पार पाडला. सदर कार्यक्रमास (Hingoli Tehsil) तहसील कार्यालयातील मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.