जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
परभणी (Parbhani water project) : जिल्ह्यात असलेल्या प्रमुख प्रकल्पातून नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. निम्न दूधना, ढालेगाव, तारुगव्हाण, मुदगल या बंधार्यांमधून नदीपात्रात पाणी सोडल्या गेले आहे. नदीत पाण्याची आवक वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
निम्न दुधना, ढालेगाव, तारुगव्हाण, मुदगल बंधार्यातून पाणी सोडले
सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पातून सोमवार २ सप्टेंबर रोजी पाणी सोडण्यात आले. या (Parbhani water project) प्रकल्पात ७१.०८ टक्के एवढा जिवंत पाणीसाठा आहे. प्रकल्पात पाण्याची होत असलेली आवक पाहता प्रकल्पाचे चार दरवाजे प्रत्येकी ०.५० मिटरने उचलण्यात आले आहेत. सोमवारी दुपारी बारा वाजेपासून ६ हजार ५२९ क्सुसेक्सने दूधना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधार्यातून ३ हजार ४९८.३५ क्युमेक्सने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
ढालेगाव उच्च पातळी बंधार्याचे पंधरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तारुगव्हाण उच्च पातळी बंधार्याचे पंधरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. (Parbhani water project) मुदगल बंधार्याचे चौदा दरवाजे उघडत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. १ दरवाजा खोलण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने तंत्रज्ञांचे पथक मुदगलकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सर्वच रस्त्यावर पुराचे पाणी असल्याने प्रकल्पाकडे जाण्यास अडचणी येत आहेत, अशी माहिती जायकवाडी उपविभाग पाथरीचे अभियंता पवार यांनी दिली.
जिंतूर तालुक्यात असलेल्या येलदरी प्रकल्पात सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत ५३.०१ टक्के एवढे पाणी होते. धरणामध्ये ७ हजार ३३८ क्येसेकने पाण्याची आवक होत आहे. सध्या या प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेले नाही. सिध्देश्वर धरणामध्ये ८७.४१टक्के एवढे पाणी आहे. (Parbhani water project) प्रकल्पाच्या सहा गेटमधून ४ हजार ९३५ क्युसेसने नदीपात्रात पाणी येत आहे. त्याचप्रमाणे स्पिलवे गेटमुळे ४ हजार ९३५ क्युसेसने पूर्णा नदीपात्रात पाणी येत आहे.
मासोळी, पिंपळदरी, टाकळवाडी लघुप्रकल्प भरले
गंगाखेड तालुक्यातील मासोळी लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्याच प्रमाणे पिंपळदरी येथील साठवण तलाव आणि टाकळवाडी लघुप्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने भरला आहे. जिल्ह्यातील इतर लघुप्रकल्पातही पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे हे (Parbhani water project) प्रकल्प देखील भरण्याच्या स्थितीत आहेत. जिल्ह्यात सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पामधील पाणीसाठा देखील झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे.