नागपूर(Nagpur) :- बुटीबोरी एमआयडीसी (MIDC)परिसरातील अनेक नामांकित कंपन्या कृष्णा व वेणा नदीत तर अतिरिक्त औधोगिक क्षेत्रातील कंपन्या नाल्यात रसायनयुक्त पाणी सोडत असल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही चा बडगा उभारने गरजेचे झाले आहे. सर्रासपणे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्याच्या प्रतापला लक्षात घेता या सन्दर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाण्याची तपासणी करण्याचे निवेदन नागपूर पंचायत समितीचे विद्यमान पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती संजय चिकटे तसेच ग्रामपंचायत आलागोंदी कडून देण्यात आले आहे.
बुटी बोरी एमआईडीसी तील गोयल व बैधनाथ कंपनीचा प्रताप
अतिरिक्त औधोगिक क्षेत्रात नव्याने तयार झालेल्या गोयल व बैधनाथ या दोन्ही कंपन्या रासायनिक पाणी बाहेर सोडले जात असल्याचा संशय निवेदनातून केला आहे .त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी ग्रामस्थ्यांची मागणी आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून बुटीबोरी एमआयडीसी ला ओळखले जाते.परंतु येथील त्या कंपन्या सर्रासपने कृष्णा व् वेणा नदीसह नाल्यात रसायनयुक्त पाणी सोडत असल्याने नदी नालायचे अस्तीत्व धोक्यात आले आहे.परंतु बुटीबोरी अतिरिक्त औधोगिक क्षेत्रातील प्रदूषण विभागचा या सदर प्रकाराला आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. बुटीबोरी अतिरिक्त एमआयडीसी मधील सर्वात मोठ्या नामांकित कंपन्याच्या दूषित पाण्यामुळे(contaminated water) पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत दूषित झाले असून नागरिक त्रस्त दिसून येत आहे त्यामुळे नागिकांच्या आरोग्यास धोका तयार झाला आहे.
असंख्य मासे मृत्यूमुखी पडले
नाल्यातील रसाययुक्त पाण्यामुळे असंख्य मासे मृत्यूमुखी पडले असून अनेक जनावरे सुद्धा दगावले आहे. अतिरिक्त औधोगिक क्षेत्रात ज्या नाल्याना रसाययुक्त पाणी सोडले जाते तो नाला चिमणाझरी, टेम्भरी व आलागोंदी परिसरातून वाहत असून कंपन्यानी दूषित पाणी सीईटीपी मध्ये प्रक्रिया न करता सरळ मोठ्या प्रमाणात नाल्यात सोडण्यात येत आहे. दूषित पाणी नदी नाल्यात सोडने नियमाच्या विरुद्ध आहे तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कारवाई (action) करतांना दिसून येत नाही. म्हणजेच पदूषण नियंत्रण मंडळाने कुठेतरी हात ओले केल्याचे दिसते. बुटीबोरी औधोगिक क्षेत्रातील कंपन्या दूषित पानी सोडत असल्याच्या तक्रारी चा विषय अनेकदा नागपूर हिवाळी अधिवेशनात गाजला.यानंतरही प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी यावर कार्यवाही करत नाही म्हणजे यांचे कुठे तरी कंपनी व्यवस्थापनाशी साठेलोटे असल्याचे दिसून येते. बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील कंपन्या दूषित पानी नदी नाल्यात सोडत असते त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून कित्येक जनावरे दगावली आहे. नदी नाल्यात दूषित पानी सोडण्याचा प्रकार नियमाच्या विरूद्ध असून सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळ का पुढे येत नाही असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहे.
कंपन्याच्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता सीएटीपी प्लांट उभारावा
परिसरातील भरपूर कंपन्या दूषित पानी नदीत सोडत असतात परन्तु काही अश्या नामांकित कंपन्या आहे की यावर कारवाईचा बडगा कधी उभरतांना दिसुनच येत नाही. त्यामुळे संबंधित विषय लक्षात घेता सर्वच कंपन्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. कंपन्याच्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता सीएटीपी प्लांट उभारावा त्यानंतर पाण्यातून रसायनयुक्त घटक काढून ते पाणी परत वापरावे नाहीतर नदी नाल्या ला सोडावे. परंतु बऱ्याच कंपनीचे मालक पैसे वाचविन्याच्या बेतात सीईटीपी प्लांट तयार करत नाही किंवा त्या प्लांट मध्ये दूषित पानी न देता सरळ नदी नाल्यात सोडत असल्याने त्यांची हिम्मत किती वाढली याची प्रचिती येते..