खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी येलदरीत धडकले
परभणी/जिंतूर (Yeldari dam) : बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचे दरवाजे उघडून नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे (Yeldari dam) येलदरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. सोमवार १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास येलदरी धरणाचे दोन गेट ०.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. या गेट मधुन ६ हजार ८२० क्युसेकने पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
परभणी, हिंगोली जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले (Yeldari dam) येलदरी धरण १०० टक्के भरले आहे. पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून नदी पात्रात पाणी सोडल्या जात असल्याने येलदरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी धरणाचे दोन गेट उघडण्यात आले आहे. वीज निर्मिती केंद्रातून तीन टरबाईनने २ हजार ६०० क्युसेस तर गेट मधुन ४ हजार २२० क्युसेस असा एकूण ६ हजार ८२० क्युसेसने पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Yeldari dam) प्रकल्पात येणार्या पाण्याची आवक पाहता पाणी विसर्गाचे प्रमाण कमी अधिक करण्यात येणार आहे.