बुलढाणा(Buldhana):- महाराष्ट्राच्या मातीतून अनेक कर्तृत्ववान महिला घडल्या आहेत. ही भूमी महिलांचा सन्मान करणारी भूमी आहे. तरीही मात्र मागील काही काळापासून बुलडाण्यासह राज्यात भयावह स्थिती आहे. नवरात्रोत्सवामध्ये देवीचा जागर सुरू आहे. आता अंबाबाईच महिलांना लढण्याचं बळ देईल, त्यामुळे आता स्त्रीशक्तीच बदल घडविणार.. असे प्रतिपादन शिवसेना (Shivsena)उबाठा. गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.
स्त्रीशक्तीच बदल घडविणार..
‘दिशा’ जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने येथे आयोजित तीन दिवसीय महिला उद्योजक मेळावा आणि महिला बचत गट प्रदर्शनीचे राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) रोहिणी खडसे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. दिनांक ४ ते ६ ऑक्टोंबर दरम्यान मलकापूर मार्गावरील ‘एआरडी मॉल’च्या मागील मैदानात ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी प्रदेश काँग्रेस समितीच्या राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस हेमलता पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. रोहिणी खडसे यावेळी म्हणाल्या की, राज्यकर्ते दीड हजार रुपये देऊन खूप काही दिल्याचा आव आणत आहेत. आजची महिला ही पुर्णपणे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आहे. तरीही दीड हजार देऊन राज्यकर्ते उपकाराची भाषा करतात, अशी खंत खडसे यांनी बोलून दाखविली. जयश्रीताई शेळके यांनी सुरू केलेल्या महिला बचत गटांच्या आर्थिक चळवळीचे त्यांनी कौतूक केले. आता तळागळातील महिला आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काची व्यक्ती जयश्रीताई शेळके यांच्याकडे पाहत असल्याची भावना हेमलता पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
अबाबाईच देईल महिलांना लढण्याचं बळ
कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कोमलताई झंवर, कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव स्वाती वाकेकर, मृणालीनी सपकाळ, मिनल आंबेकर, सरिता एकडे, नंदिनी टारपे, पद्मजा लिंगाडे, अर्चना खेडेकर, मालती शेळके, लक्ष्मी शेळके, कमल बुधवत, हिना सौदागर, महिला उद्योजिका सीताबाई मोहिते यांची विशेष उपस्थिती होती. महिला बचत गटाच्या पदाधिकारी, सदस्यांची तसेच जिल्ह्यातील महिलांची हजारोंच्या संख्येने भरगच्च उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्यापूर्वी समाज प्रबोधनकार प्रवीण दवंडे यांचे कीर्तन रंगले. तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
▪️२५० हून अधिक स्टॉलने थाटली प्रदर्शनी..
बुलढाणा येथे आयोजित तीन दिवसीय बचतगट प्रदर्शनीत जवळपास २५० हून अधिक स्टॉल लावण्यात आले आहे. खाद्यजत्रा, हस्तकलावस्तू, हस्तशिल्प, घरगुती पदार्थ व मसाले, महिला गृहउद्योग उत्पादित वस्तू, महिलांचा स्नेहमिलन सोहळा, महिलांचा आनंदोत्सव, महिला उद्योजकांचा गौरव समारंभ असे या प्रदर्शनीचे वैशिष्ट्ये आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्यादृष्टीने ही बचटगट प्रदर्शनी महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
▪️समाजप्रबोधनकार प्रविण दवंडे यांचे किर्तन ठरले आकर्षण..
बचतगट प्रदर्शनीत दोन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. प्रसिद्ध समाजप्रबोधनकार पवनजी दवंडे यांचा प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी त्यांनी आपल्या वाणीतून केली. त्यांच्या कीर्तनाला महिला आणि तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
▪️बंजारा भगिनींनी लेंगी नृत्याने केले मान्यवरांचे स्वागत..
प्रदर्शनीवेळी मान्यवरांचे आगमन होताच बंजारा भगिनींनी त्यांचे पारंपरिक लेंगी नृत्य करुन मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सर्व महिला त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होत्या.