अधिकार्यांवर कठोर कारवाईचा इशारा
नागपूर (Nitin Gadkari) : रस्ते बांधकाम व विकासाच्या कामांच्या संदर्भात नागपूर शहरातील विकास यंत्रणांचा आपसात समन्वय दिसत नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी तात्काळ पावले न उचलल्यास संबंधित यंत्रणांमधील जबाबदार अधिकार्यांवर कठोर कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अलिकडेच ना. गडकरी (Nitin Gadkari) यांनी महापालिका आणि (Nagpur Improvement Project) नागपूर सुधार प्रन्यास यांच्या कामांसंदर्भात जनसंपर्क कार्यक्रम केले. तेथे नागरिकांनी दोन्ही यंत्रणांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आणि मंत्री महोदयांना अडचणींसह त्रासाची निवेदनेही दिली. याशिवाय, अनेक लोकप्रतिनिधींनी विकास कामांतील समन्वयाचा अभाव आणि त्याच्या परिणामी नागरिकांना होत असलेला त्रास गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिला.
ना. गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा, दिवाळी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन यासारखे उत्सव तोंडावर असताना नागपूर शहरातील विकास यंत्रणांमध्ये समन्वय दिसत नाही. रस्ते कामांच्या संदर्भात हे प्रकर्षाने दिसत आहे. ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. त्यामुळे रोगराई वाढत चालली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर महापालिका, नासुप्र, मेट्रो रेल्वे, विद्युत विभाग, टेलिफोन विभाग यांच्यात कोणताही समन्वय नाही. कुणीही येतो आणि तयार झालेला रस्ता खोदतो. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. प्रदूषण वाढते. नागरिकांना त्रास होतो. अपघात होतात. आता या यंत्रणा आणि संस्थांच्या प्रमुखांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि नागरिकांचा त्रास संपवावा किंवा कारवाईस सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असा इशाराही ना. गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिला आहे.
संबंधित यंत्रणांनी जागरुक असावे
नागपुरातील विकास कामे जोरात सुरू आहेत. पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. (Nagpur Improvement Project) विकासकामे होत आहेत, याचे समाधान आहे. पण, विकासाचा त्रास नागरिकांना होत असेल तर त्याबद्दल संबंधित यंत्रणांनी जागरूक असले पाहिजे. रस्त्यांच्या बांधकामात लेव्हल तपासून पुढे जाणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था राखणे, वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेणे हे सारे होत नसल्यामुळे या विकास कामांबद्दल आस्था वाटण्याऐवजी नागरिक नाराजी व्यक्त करीत असल्याकडे ना. गडकरी (Nitin Gadkari) यांनी लक्ष वेधले आहे.