परभणी(Parbhani) :- व्हॉलिबॉल (Volleyball) खेळत असताना लहान मुलांना मारहाण का करता, अशी विचारणा केल्यावर आरोपींनी संगणमत करत एकाला चाकुने भोसकून गंभीर जखमी केले. जखमीला उपचारासाठी छत्रपती संभाजी (Chhatrapati Sambhaji)नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान दिलेल्या तक्रारीवरुन ३१ मे रोजी आरोपींवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मारहाणीची ही घटना परभणी शहरातील अंबिका नगर येथील मैदानावर घडली होती.
उपचारा दरम्यान दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा
पवन दिलीप सहजराव वय २४ वर्ष यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे अंबिका नगर येथील मैदानावर मित्रांसोबत व्हॉलिबॉल खेळत असताना त्यांनी आरोपींना येथील लहान मुलांना मारहाण(beating) का करता, अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपीने चाकुने भोसकून तसेच फायटरने मारुन दुखापत केली. जबर मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी(seriously injured) झाले. ही घटना ७ मे रोजी घडली होती. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान दिलेल्या तक्रारीवरुन तुषार थोरात, साहिल थोरात, अभिजीत थोरात, अनिता थोरात यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. तपास सपोनि. भिकाणे करत आहेत.